भारताचे विभाजन करून अर्धा भाग स्वतंत्र देश म्हणून ख्रिश्चनांना देऊन टाका. मग आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही असे संतापजनक वक्त्यव्य तेलंगणातील एक ख्रिश्चन पाद्रीने केले आहे. Divide India and give half of the country to Christians as an independent country, says Christian pastor
विशेष प्रतिनिधी
अमरावती : भारताचे विभाजन करून अर्धा भाग स्वतंत्र देश म्हणून ख्रिश्चनांना देऊन टाका. मग आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही असे संतापजनक वक्त्यव्य तेलंगणातील एक ख्रिश्चन पाद्रीने केले आहे.
बायबल ओपन युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल (BOUI) चा उपसंचालक असलेल्या पास्टर उपेंद्र याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात हा पाद्री म्हणताना दिसत आहे की भारताचे दोन भागात विभाजन करावे. त्यातील एक भाग ख्रिश्चनांच्यासाठी देऊन टाका. त्यानंतर आम्ही तुम्हाला कोणताही त्रास देणार नाही.
पाद्री उपेंद्र म्हणताना दिसत आहे की लाडके नेते श्री पी.डी. सुंदरा राव यांच्या नेतृत्वाखाली, आम्ही अखिल भारतीय ख्रिश्चन परिषदेच्या (एआयटीसीसी) वतीने मागणी करतो. भारताचे विभाजन करून अर्धा भाग ख्रिश्चनांना स्वतंत्र देश म्हणून देण्यात यावा अशी आमची मागणी आहे.
24 ऑगस्ट रोजी हा धक्कादायक व्हिडिओ एससी एसटी राइट्स फोरमने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. एससी/एसटी अधिकाऱ्यांसाठी काम करणारा हा गट आहे.
यापूर्वी केरळच्या एका बिशपने आरोप केला होता की ख्रिश्चन समाजातील मुली आणि महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत.
सायरो मलबार कॅथोलिक चर्चचे बिशप जोसेफ कलंगारत यांनी म्हटले होते की ख्रिश्चन तरुणींना फोन कॉलद्वारे मैत्री करून फसवण्याचा प्रयत्न होत आहे.
Divide India and give half of the country to Christians as an independent country, says Christian pastor
महत्त्वाच्या बातम्या
- महिला अधिकाऱ्याची बोटे छाटणारा परप्रांतीय भाजीवाला जामिनावर सुटू देत, मनसैनिक त्याला बघून घेतली; राज ठाकरे यांचा घणाघात
- राहुल गांधींच्या सभेच्या 24 तास आधीच दिल्लीत काँग्रेससाठी वाईट बातमी, अनेक नेते ‘आप’ मध्ये सामील
- Maharashtra Rains : औरंगाबादेत पाझर तलाव फुटला : कन्नड-चाळीसगाव सीमेवर ढगफुटी ; दरड कोसळल्याने रस्ता बंद ; बीड जिल्ह्यातही अलर्ट
- 70 वर्षांच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयात एकाच वेळी 9 न्यायाधीशांचा शपथविधी, कोरोना प्रोटोकॉलमुळे विशेष कार्यक्रम