विशेष प्रतिनिधी
जळगाव : जळगाव जिल्ह्यात नवीन विंचवाच्या प्रजातीचा शोध लागला आहे. त्याचे सातपुडा पर्वतावरुन नामकरण करण्यात आले आहे. Discovery of new Scorpion species in Jalgaon district …. Naming from Satpuda mountain
ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक विवेक वाघे, सत्पाल गंगलमाले आणि अक्षय खांडेकर यांनी हे संशोधन केले आहे. नवीन प्रजातीं ही बुथीडी कुळातल्या कॉमसोबुथस या जातीमधील आहे. जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यातील वाघझीरा व खिरोदा या गावात ही प्रजाती आढळून आली आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी ही आढळली म्हणून तिचे नामकरण कॉमसोबुथस सातपुराएनसीस (Compsobuthus satpuraensis) असे करण्यात आले आहे. जगभरात कॉमसोबुथस या जातीच्या ५० प्रजाती आढळून येतात. भारतीय उपखंडातील ही सहावी, भारतातली चौथी तर महाराष्ट्रातील पहीली प्रजाती आहे.
रंग, शेपटीरावरील वैशिष्ट्यपूर्ण दाणेदार रचना, पेक्टीनल टीथची संख्या, लांबी व रुंदी यांचे गुणोत्तर, शरीरावरील उठाव यासह इतर अनेक वैशिष्ट्यांसह ही प्रजाती आपल्या जातीतील इतर प्रजातीपेक्षा वेगळी ठरते. नवीन प्रजाती इतर विंचवांप्रमाणेच निशाचर असून ती माळराने, झुडपी जंगले, व पानगळीच्या जंगलांमध्ये दगडांच्या आडोश्याने आढळून येते.
२०२०च्या ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदा ही प्रजाती आढळून आली होती. साधारण वर्षभर त्यावर संशोधन केल्यानंतर ही प्रजाती वेगळी असल्याचे लक्षात आले, त्यासंबंधीच्या संशोधनाची तज्ञानी पुष्टी केल्यानंतर हा शोधनिबंध अमेरिकेतुन प्रकाशित होणाऱ्या युस्कोर्पिअस या संशोधन पत्रिकेतून काल प्रकाशित करण्यात आला. या संधोधनात महाराष्ट्रातील विवेक वाघे हे जळगाव जिल्ह्य़ातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील रहिवासी आहेत, सत्पाल गंगलमाले (सोलापुर), अक्षय खांडेकर (सांगली) या संशोधकांचा समावेश आहे. या शोधामुळे भारतात अजूनही विंचु आणि एकूणच पर्यावरणीय संशोधनाच्या दृष्टीने फारसे काम झालेले नाही, हे अधोरेखित होते. जळगाव जिल्ह्याला लाभलेल्या सातपुड्यात अनेक दुर्मीळ प्रजातींचा शोध आतापर्यंत लागला असून, आता नव्याने सातपुड्यात बुथिडी कुळातल्या कॉमसोबुथस या जातीमधील विंचवाच्या नवीन प्रजातींची नोंद झाली आहे.
ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक विवेक वाघे, सत्पाल गंगलमाले व अक्षय खांडेकर तीन वन्यजीवांसाठी काम करणाऱ्या संशोधकांनी ही नोंद केली असून, महाराष्ट्रात या प्रजातीची ही पहिलीच नोंद आहे. यामुळे सातपुड्याचे महत्व पुन्हा एकदा नव्याने अधोरेखित झाले आहे. तिन्ही संशोधक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र तेजस ठाकरे यांच्या ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनमार्फत दुर्मीळ प्रजातींचा शोध घेवून, त्या प्रजातींच्या संरक्षणासाठी काम करतात.
सातपुडा पर्वतावरून देण्यात आले विंचवांना नवीन नावनवीन प्रजातीं ही बुथिडी कुळातल्या कॉमसोबुथस या जातीमधील आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल वनक्षेत्रालगत असलेल्या वाघझिरा व खिरोदा या गावात ही प्रजाती आढळून आली आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी ही आढळली म्हणून तिचे नामकरण ‘कॉमसोबुथस सातपुराएनसीस’ असे करण्यात आल्याची माहिती विवेक वाघे यांनी दिली. जगभरात कॉमसोबुथस या जातीच्या ५० प्रजाती आढळून आल्या आहेत. या प्रजातीची भारतीय उपखंडातील ही सहावी, भारतातली चौथी तर महाराष्ट्रातील पहीलीच नोंद आहे.
काय आहेत वैशिष्टये?
१) या प्रजातीच्या विंचवाचा रंग, शेपटीरावरील वैशिष्ट्यपूर्ण दाणेदार रचना, पेक्टीनल टीथची संख्या, लांबी व रुंदी यांचे गुणोत्तर, शरीरावरील उठाव यासह इतर अनेक वैशिष्ट्यांसह ही प्रजाती आपल्या जातीतील इतर प्रजातीपेक्षा वेगळी ठरते.२) नवीन प्रजाती इतर विंचवांप्रमाणेच निशाचर असून ती माळराने, झुडपी जंगले, व पानगळीच्या जंगलांमध्ये दगडांच्या आडोश्याने आढळून येते. अमेरिकेतील युस्कोर्पिअस संशोधन पत्रिकेत झाली नोंदऑक्टोबर २०२० मध्ये पहिल्यांदा ही प्रजाती आढळून आली होती.
साधारण वर्षभर त्यावर संशोधन केल्यानंतर ही प्रजाती वेगळी असल्याचे लक्षात आले. त्यासंबंधीच्या संशोधनाची तज्ज्ञांकडून पुष्टी केल्यानंतर हा शोधनिबंध अमेरिकेतून प्रकाशित होणाऱ्या ‘युस्कोर्पिअस’ या संशोधन पत्रिकेतून २४ फेब्रुवारी रोजी प्रकाशित करण्यात आला. या संधोधनात महाराष्ट्रातील विवेक वाघे, सत्पाल गंगलमाले, अक्षय खांडेकर या संशोधकांचा समावेश आहे. या शोधामुळे भारतात अजूनही विंचु आणि एकूणच पर्यावरणीय संशोधनाच्या दृष्टीने फारसे काम झालेले नाही, हे अधोरेखित होते अशी प्रतिक्रिया या विवेक वाघे या संशोधकांने दिली. ते म्हणाले आम्हा संशोधकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांचे वेळोवेळी पाठबळ मिळत असते. तसेच अक्षय खांडेकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते, असे विवेक वाघे यांनी सांगितले
Discovery of new Scorpion species in Jalgaon district …. Naming from Satpuda mountain
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करून त्यांचीच फसवणूक, मुख्यमंत्र्यांसह मराठा मंत्र्यांनी राजीनामे देण्याची राधाकृष्ण विखे-पाटील यांची मागणी
- शर्मीला ठाकरे म्हणतात, १५ वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी कानाखाली वाजवली म्हणून आज सर्वत्र मराठीचा वापर
- गाढ झोपून हा युवक मिळवितो लाखो रुपये, यू ट्यूबची कमाल
- Russia Ukraine War : रशिया यूक्रेनवर अणुबॉम्ब टाकणार? राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी यंत्रणेला केलं अलर्ट
- Kili Paul : किली पॉल-नीमा वर पंतप्रधान मोदी देखील फिदा ! त्यांच्या प्रतिभेचा आदर करत ‘मन की बात’मध्ये उल्लेख… म्हणाले भारतीय संगीताची जादू…