• Download App
    दिग्दर्शक रवी टंडन यांचे निधन|Director Ravi Tondon Passes Away

    दिग्दर्शक रवी टंडन यांचे निधन

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अमिताभ बच्चन यांचे ‘मजबूर’ आणि ‘खुद्दार’ सारखे हिट सिनेमे देणारे, आग्रा येथे जन्मलेले दिग्दर्शक रवी टंडन यांचे मुंबईत निधन झाले. त्यांच्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये ‘अनहोनी’ आणि ‘खेल खेल में’ यांचा समावेश आहे. अभिनेत्री रवीना टंडन त्यांची मुलगी आहे. Director Ravi Tondon Passes Away

    संजीव कुमार यांच्या जवळच्या मित्रांपैकी एक असलेल्या रवी टंडन यांनी चित्रपट दिग्दर्शक आरके नय्यर यांचे सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
    ‘लव्ह इन शिमला’ आणि ‘ये रास्ते हैं प्यार के’ या चित्रपटांमधून चित्रपट दिग्दर्शनातील बारकावे शिकल्यानंतर रवी टंडन यांनी दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट ‘अनहोनी’ केला.



    या चित्रपटातील संजीव कुमारच्या अभिनयाचे आजही कौतुक होत आहे. यानंतर त्यांनी ऋषी कपूरसोबत ‘खेल खेल में’ हा चित्रपट बनवला, त्याचा रिमेक म्हणून अक्षय कुमारचा ‘खिलाडी’ चित्रपट बनवण्यात आला.

    रवी टंडन यांचे शुक्रवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. रवीना टंडननेही तिच्या वडिलांचे फोटो शेअर करत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टला चित्रपट जगतातील तमाम मंडळी श्रद्धांजली वाहत आहेत.

    Director Ravi Tondon Passes Away

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!