दिग्दर्शक केदार शिंदेने प्रेक्षकांचे व्यक्त केले आभार.
विशेष प्रतिनिधी
पुणे : केदार शिंदे दिग्दर्शित “बाई पण भारी देवा” हा सिनेमा! मराठी मनोरंजन विश्वात सध्या प्रचंड गाजतोय. अनेक कलाकारांनी या सिनेमाचं आपल्या समाज माध्यमातून भरभरून कौतुक केले आहे. महिला वर्गाने तर या सिनेमाला अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं आहे. बाईपणाचे महत्त्व सांगणारा. हळव्या नात्याचा कोपरा जपत, या सिनेमानं मानवी भावभावना यावर अतिशय सुंदर असं भाष्य केलं आहे. Digdarshak ke Dara Shinde’s movie bhai banvari Deva. Record break collection.
अतिशय तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमात सहा बहिणींची कथा अतिशय सुंदर रित्या गुंफली आहे . महिला वर्गांकडून या सिनेमाचे महाराष्ट्रभर विशेष असे शो आयोजित केले जात आहेत. भरजरी पैठणी घालून नाकात नथ, गॉगल लावून बाई पण मिरवत महिला वर्ग या सिनेमाचीं मज्जा लुटत आहेत.
कलेक्शनच्या बाबतीत देखील या सिनेमानं चांगलंच काम केलं आहे. 30 जूनला रिलीज झालेल्या या बाईपण भारी देवा सिनेमाचं बॉक्स ऑफीस कलेक्शन समोर आलंय.या सिनेमाने विकेंडला रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केलीय. बाईपण भारी देवा सिनेमाने बॉक्स ऑफीसवर ६.४५ कोटींची कमाई केलीय. या वर्षातली मराठी सिनेमातली आजवरची ही रेकॉर्ड ब्रेक कमाई आहे.
.या यशाबद्दल बाईपण भारी देवा चा दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात.. ही स्वामींची कृपा. हा सिध्दीविनायकाचा महाप्रसाद. मला २१ वर्ष लागली दादरचा एक रस्ता क्रॉस करायला! २००२ साली सही रे सही आलं. त्याला तुम्ही मायबाप प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. गेली कित्येक वर्ष त्याचे “हाऊसफुल्ल” चे बोर्ड मी पाहातो आहे. त्यानंतर अनेक नाटकं, सिनेमे यालाही भरभरून प्रतिसाद दिलात.केदार शिंदे पुढे म्हणतात.. अगं बाई अरेच्चा, जत्रा ते महाराष्ट्र शाहीर पर्यंतच्या प्रवासात तुमची साथ लाखमोलाची ठरली. मात्र खऱ्या अर्थाने “सही” नंतर “बाईपण भारी देवा” चं हे यश पाहातो आहे. याला फक्त तुम्हीच कारणीभूत आहात. मी काम अविरतपणे सुरू ठेवेन. तुम्ही मात्र सोबत राहा. खुप भावना व्यक्त करायच्या आहेत. पण योग्य वेळी नक्कीच करीन.
बाई पण भारी देवा या सिनेमात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते ,सुकन्या मोने कुलकर्णी, शिल्पा नवलकर दीपा परब चौधरी, या अभिनेत्रींची मुख्य भूमिका आहे. या सहा गुणी अभिनेत्रीची धमाल या चित्रपटात बघायला मिळतं आहे.
Digdarshak ke Dara Shinde’s movie bhai banvari Deva. Record break collection.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादी फुटली; वसंतदादांच्या आत्म्याला चिरशांती मिळाली असेल; शालिनीताईंचा पवारांना टोला
- “केवळ महाराष्ट्रच नाही, तर उत्तर प्रदेशातही होऊ शकतो मोठा खेळ’’
- राष्ट्रवादीतल्या सिंडिकेट – इंडिकेट संघर्षात शरद पवारांना त्यांच्या गटाचे समर्थन जरूर, पण महाराष्ट्रात सहानुभूती का नाही??
- Land for Job Scam : तेजस्वी यादव यांच्या विरोधात CBI कडून आरोपपत्र दाखल!