• Download App
    दिगंबरा दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा… च्या जयघोषामध्ये नरसोबावाडीत दत्त जयंतीचा सोहळा Digambara Digambara… Shripad Vallabh Digambara… Datta Jayanti celebration in Narasobawadi

    दिगंबरा दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा… च्या जयघोषामध्ये नरसोबावाडीत दत्त जयंतीचा सोहळा

    विशेष प्रतिनिधी

    शिरोळ : दिगंबरा दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा… च्या जयघोषामध्ये शनिवारी नरसोबावाडी दुमदुमली. दत्त जयंतीचा सोहळा अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला.
    Digambara Digambara… Shripad Vallabh Digambara… Datta Jayanti celebration in Narasobawadi

    दत्त पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. मंदिर परिसरामध्ये भाविकांनी कळसाचे दर्शन घेतले. मंदिरामध्ये आकर्षक रांगोळी काढण्यात आली.

    काकड आरती भजन कीर्तनाने वातावरण मंगलमय झाले. दत्त मंदिर आकर्षक फुलांनी सजविले आहे. विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.  कर्नाटक, महाराष्ट्र, सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक आदी भागातून दत्त दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. कोल्हापूर प्रशासनाकडून व दत्त देवस्थान समितीकडून बंदोबस्त ठेवला आहे.

    कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नरसोबावाडी येथे गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे दत्त जयंती साजरी झाली नव्हती. पण यावेळी नियमांचे काटेकोरपणे पालन करून दत्त जयंती उत्सव थाटात साजरा करण्यात आला.

    Digambara Digambara… Shripad Vallabh Digambara… Datta Jayanti celebration in Narasobawadi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Kesari Sikandar Sheikh : महाराष्ट्र केसरी सिकंदरला शस्त्र तस्करीप्रकरणी पंजाबमध्ये अटक; पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचा संशय

    दोन ठाकरे + दोन्ही पवार यांना स्थानिक निवडणुकीत समान यश भाजपच्याच पथ्यावर!!

    Powai : पवईत 17 मुले ओलीस ठेवणाऱ्या आरोपीचे एन्काउंटर, ऑडिशनसाठी बोलावून दाखवला बंदुकीचा धाक, पोलिसांनी 2 तासांत केली सुटका