• Download App
    धुळ्यात सर्वात नीचांकी तापमानाची नोंद; पारा @ २.८ अंश सेल्सिअसवर पोचला । Dhule recorded the lowest temperature; Mercury reached 2.8 degrees Celsius

    धुळ्यात सर्वात नीचांकी तापमानाची नोंद; पारा @ २.८ अंश सेल्सिअसवर पोचला

    विशेष प्रतिनिधी

    धुळे : शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा तापमानात घसरण झाली असून, थंडीची हुडहुडी वाढली आहे. यंदाच्या हंगामातील सर्वांत नीचांकी तापमानाची नोंद धुळे जिल्ह्यात झाली. मागील महिन्यात पारा ५ अंश सेल्सिअसवर तर काल ४.५ अंश सेल्सिअस तर आज २.८ इतक्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. Dhule recorded the lowest temperature; Mercury reached 2.8 degrees Celsius

    वातावरणात मोठ्या प्रमाणात गारठा वाढल्याने सकाळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या घटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या वातावरणाचा परिणाम रब्बी पिकांवर देखील होणार असून गहू, हरभरा, मका या पिकांवर करपा रोगासारख्या अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात तज्ञाकडून वर्तवण्यात येत आहे. वाढत्या थंडीचा परिणाम लक्षात घेता हृदयाचे आजार असणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील वैद्यकीय तज्ञांच्या वतीने करण्यात आले आहे.

    Dhule recorded the lowest temperature; Mercury reached  2.8 degrees Celsius

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sangeet Sannyasta Khadga : ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकावरून वाद पेटला, गौतम बुद्धांचा अवमान झाल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप

    jayant patil : जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार; शरद पवारांशी चर्चा करून 2 दिवसांत राजीनाम्याची शक्यता

    महापालिका + झेडपी निवडणुकांचा महायुतीचा खरा फॉर्म्युला; ठाकरे + पवार ब्रँड गुंडाळा, अख्खा महाराष्ट्र आपसांतच वाटून घ्या!!