प्रतिनिधी
मुंबई : धनंजय मुंडे परवा सभागृहाबाहेर बेंबीच्या देठापासून घोषणा देत होते. एवढ्या जोरात की, अनेक वर्षांपासून ते शिवसैनिक आहेत, अशी शंका यावी. त्यांचा सगळा राजकीय प्रवास आम्हाला माहिती आहे. एकेकाळी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर प्रेम, दया, “करुणा” दाखवली होती, पण पुनःपुन्हा तशी दया दाखवता येणार नाही, असे जोरदार फटाके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत वाजविले. Devendraji showed mercy compassion to Dhananjay Munden told eknath shinde
संयमी मितभाषी शिवसैनिक अशी ओळख असलेल्या एकनाथ शिंदे यांची विधानसभेच्या सभागृहातील जोरदार फटकेबाजी केली. ती ऐकून सारेच अवाक झाले. नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयकावरील चर्चेत ते बोलत होते. शिंदे म्हणाले, छगन भुजबळ यांनी मला एकदा विचारले होते, ‘काय बाबा कसं चाललंय ठीक आहे ना, ओके आहे ना?’ त्यावर मी त्यांना ‘सगळं एकदम ओक्के आहे’, असे सांगितले होते. त्यामुळे भुजबळ आणि अजित पवार यांना सगळ्या गोष्टी माहिती होत्या, असेही शिंदे यांनी सांगितले.
रिमोट कंट्रोल कुणाकडे, हे सर्वांना कळलंय
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून स्वतः भाजपचे ऐकू नये कारण त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपच सरकार चालवत आहे, असे शरसंधान राष्ट्रवादीच्या अनेक सदस्यांनी साधले होते. यात विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील आदी सदस्य आघाडीवर होते. या सगळ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुरून उरले. त्यांनी विरोधी सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर तुफान फटकेबाजी केली.
महाविकास आघाडीतील कारभारावर भाष्य करताना शिंदे म्हणाले, कुणी कुणाच्या खांद्यावरून बंदूक चालवली, कोणाकडे रिमोट कंट्रोल होता, हे अजितदादांना सगळे माहिती आहे. ते (उद्धव ठाकरे) तुमचे ऐकत होते, म्हणूनच आमचे ऐकत नव्हते, असे शरसंधान शिंदे यांनी साधले.
पारदर्शकता येईल
नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडल्यास धनशक्ती, गुंड प्रवृत्ती बळावेल, असे विरोधी पक्षाचे सदस्य म्हणत आहेत. पण पैसेवाला किंवा गुंड एखाद्या विभागावर प्रभाव पाडू शकेल, संपूर्ण शहरावर असा प्रभाव पडणे शक्य नाही. नगराध्यक्षाला अधिकार देण्याबाबत तुमच्या सूचनांचा विचार आम्ही करू. मात्र, कारभारात पारदर्शकता आणायची असेल, तर लोकांमधून नगराध्यक्ष निवडून आणणेच योग्य होईल, असे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.
Devendraji showed mercy compassion to Dhananjay Munden told eknath shinde
महत्वाच्या बातम्या
- दिल्ली, जम्मू – काश्मीर मध्ये “नवे” राजकीय घमासान घडवायला विरोधकांचा जमावडा!!; कसा तो वाचा!!
- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान अडचणीत, कधीही होऊ शकते अटक
- शंखी गोगलगाय प्रादुर्भावावर अभ्यास समिती, सोयाबीनचे झालेले नुकसान पंतप्रधान पीक विम्याच्या नियमात बसवणार, कृषिमंत्री अब्दुल सत्तार
- नोकरीची संधी : एमपीएससीमध्ये 228 पदांवर भरती, आज अर्जाची शेवटची तारीख!!; असा करा अर्ज