• Download App
    शिवसेना - भाजप युतीमध्ये देवेंद्र फडवणीस आमचे नेते!!; शिवसेनेचे मंत्री उदय सामंतांचा विरोधकांना टोला Devendra Fadwanis is our leader in the Shiv Sena-BJP alliance

    शिवसेना – भाजप युतीमध्ये देवेंद्र फडवणीस आमचे नेते!!; शिवसेनेचे मंत्री उदय सामंतांचा विरोधकांना टोला

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात आता निवडणुका झाल्या तर शिवसेना – भाजप युतीला 165 ते 185 जागा मिळून सत्तेवर येण्याची संधी असल्याचे सर्वेक्षण झी न्यूजने प्रसिद्ध केल्यानंतर दोन्ही पक्षांमधल्या नेत्यांचा उत्साह वाढला आहे. पण त्याच वेळी मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा सुमारे तीन 3 – 3.5% मते जास्त मिळाल्याने विरोधकांना सवाल करण्याची आयती संधी मिळाली आहे. Devendra Fadwanis is our leader in the Shiv Sena-BJP alliance

    “केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र”, या घोषणेचे काय झाले?, असा सवाल विरोधकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेने वेगवेगळ्या वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर “देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे”, अशा जाहिराती दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या मुद्द्यावरूनही विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला आहे.


    आणखी एक राजकीय भूकंपाची चाहुल, ठाकरे गटाचे सर्व 13 आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात- उदय सामंत


    पण आता शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी पुढे येऊन युतीमध्ये देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत, असे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत त्यांना जाब विचारण्याची भाषा ठाकरे यांनी केली आहे. त्यावर तुम्ही आम्हाला काय जाब विचारणार?? जाब विचारणाऱ्यांना 11 महिन्यांपूर्वीच जागा दाखवली आहे. युतीमध्ये देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. त्यामुळे करायची असेल तर ठाकरे गटाने विनंती करावी, असा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे.

    Devendra Fadwanis is our leader in the Shiv Sena-BJP alliance

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा