फडणवीस यांचे रविवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास अमरावतीत आगमन होण्याची शक्यता आहे.Devendra Fadnavis on Amravati tour tomorrow
विशेष प्रतिनिधी
अमरावती : रविवार २१ नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती शहराच्या दौर्यावर येणार आहे. फडणवीसांचा हा अमरावती दौरा १२ व १३ नोव्हेंबरच्या घटनांमुळे शहरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर असल्याचं मानला जात आहे. त्यांच्या दौर्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फडणवीस यांचे रविवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास अमरावतीत आगमन होण्याची शक्यता आहे. दुपारपर्यंत त्यांच्या दौर्याला अंतीम स्वरूप देण्यात येत असल्याचे भाजपाचे शहराध्यक्ष किरण पातुरकर यांनी सांगितले.या दौर्यात फडणवीस भाजपा कार्यकर्त्यांशीही ते संवाद साधतील. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबतही ते चर्चा करू शकतात.
या दौर्यात ते प्रामुख्याने १२ व १३ नोव्हेंबरच्या घटनांचा सखोल आढावा घेणार आहे.दरम्यान अमरावती घटनेनंतरचा पोलिस तपास, आत्तापर्यंत झालेली कारवाई,तसेच या संदर्भात ते पोलिसांशी चर्चा करून माहिती घेण्याची शक्यता आहे.
Devendra Fadnavis on Amravati tour tomorrow