महाविकास आघाडी सरकारने परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.
विशेष प्रतिनिधी
नागपूर : शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. Devendra Fadnavis first reaction after the state government revoked the suspension of Parambir Singh
नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या निलंबन मागे घेण्याच्या निर्णयाबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘’केंद्रीय प्रशासकीय लवाद, कॅटचा निर्णय आल्याने, त्या आदेशानुसार त्यांचे निलंबन मागे झाले आहे. त्यांच्याविरुद्धची विभागीय चौकशी बंद करण्याचे आदेश सुद्धा कॅटने दिले होते.’’
याशिवाय, ‘’कॅटचा निर्णय आला आणि त्या निर्णयात त्यांची खात्यांर्गत चौकशी चुकीची ठरवत, ती बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, त्यांच्यावरचं निलंबन हे कॅटनेच रद्द केलं आहे. कॅटच्या निर्णयाची केवळ अंमलबजावणी आता राज्य सरकारने केली आहे.’’ असंही यावेळी फडणवीसांनी सांगितलं.
भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर महाविकास आघाडी सरकारने परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारच्या या नवीन निर्णयानंतर निलंबनाच्या कालावधीत परमबीर सिंह हे सेवेवर होते, असं गृहीत धरलं जाणार आहे.
परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. यानंतर मोठी खळबळ माजली होती, शिवाय अनिल देशमुखांना तुरुंगातही जावे लागले. परमबीर सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट पत्र पाठवले होते आणि पोलिसांना विविध ठिकाणांहून पैसे गोळा करायला सांगितले जातात, पैसे गोळा करण्याचे टार्गेट दिलं जातं, असे आरोप परमबीर सिंह यांनी केले होते.
Devendra Fadnavis first reaction after the state government revoked the suspension of Parambir Singh
महत्वाच्या बातम्या
- अदानी-हिंडेनबर्ग वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, तज्ज्ञांच्या समितीने न्यायालयात अहवाल सादर केला
- द फोकस एक्सप्लेनर : दिल्ली सरकारच्या कामकाजात नायब राज्यपालांना आता कोणते अधिकार? सर्वोच्च निकालानंतर किती बदल होईल? वाचा सविस्तर
- एलन मस्क सोडणार ट्विटरचे सीईओ पद, 6 आठवड्यांत महिला सीईओ करणार जॉइन
- पंतप्रधान मोदी आज गुजरात दौऱ्यावर, 4400 कोटींच्या प्रकल्पांची करणार पायाभरणी