Tuesday, 6 May 2025
  • Download App
    भाजपने उत्पलला नाही तर उत्पने भाजपला नाकारले, काहींना त्यांचे राजकारण संपवायचे आहे, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप|Devendra Fadnavis alleges that not BJP but Utpal, rejected Bjp, some want to end his politics

    भाजपने उत्पलला नाही तर उत्पने भाजपला नाकारले, काहींना त्यांचे राजकारण संपवायचे आहे, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    पणजी: भाजपने उत्पलला नाही नाकारलं, उत्पल पर्रिकरने भाजपला नाकारले याचे मला दु:ख आहे. पक्षाने पूर्ण क्षमतेने उत्पलला राजकारणात आणून त्यांचं करिअर घडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकं आहेत जे उत्पल पर्रिकर यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण त्यांना उत्पलचे राजकारण संपवायचे आहे, असा आरोप गोव्याचे निवडणूक प्रभारी आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.Devendra Fadnavis alleges that not BJP but Utpal, rejected Bjp, some want to end his politics

    एका दूरचित्रवाहिनीशी फडणवीस बोलत होते. आपण उत्पल पर्रिकर यांना तिकिट न देता प्रचंड गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला तिकिट दिलं. असा सवाल जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर फडणवीस म्हणाले, आपण ज्यांच्याबाबत बोलत आहात त्यांना कोणी आणलं? 2017 मध्ये त्यांना मनोहर पर्रिकर यांनी डीडीए चेअरमन बनवलं .



    त्यानंतर ते आमच्या पक्षात आले. तीन वर्ष आम्ही त्यांना सोबत ठेवून सरकार चालवलं . तेव्हा कोणी आक्षेप घेतला नाही, तेव्हा याची चर्चा झाली नाही. त्यामुळे मोन्सेरात यांना जे तिकिट देण्यात आलं आहे ते योग्य असल्याचं म्हटलं आहे.फडणवीस म्हणाले, आता तीन वषार्नंतर जेव्हा निवडणूक लढविण्याचा विषय आला तर आम्ही उत्पल पर्रिकरांना तिकिट नाकारलं नाही.

    आम्ही उत्पल यांना एवढंच म्हटलं की, बाबूश हे आत्ताच त्या मतदारसंघातून निवडून आले आहेत. आम्ही तुम्हाला दुसरी सीट देतो. दोन सीट आम्ही त्यांना ऑफर केल्या. ज्यापैकी एक सीट भाजप सतत जिंकत आली आहे. आम्ही त्यांना असंही म्हटलं की, तुम्ही इथून जिंकून या आम्ही आपल्याला आजच तुम्हाला वचन देतो की, पाच वषार्नंतर तुम्ही पणजीमधून लढा. आम्ही तुम्हाला पाच वषार्नंतर पणजी मतदारसंघातून तिकिट देऊ.

    पक्ष अशा पद्धतीने सांगत असेल तर ती गोष्ट मान्य करायला हवी होती. जर मनोहरभाई असते तर ही गोष्ट त्यांनी नक्कीच मान्य केली असती. मनोहर पर्रिकरांवर आमची सगळ्यांची श्रद्धा होती आणि आजही आहे. त्यांचं कुटुंब हे आम्हाला आमचं कुटुंब वाटतं. ते कुटुंब आमच्यापासून दूर जाणं याचं दु:ख आहे. पण पक्ष एका व्यक्तीच्या आधारावर किंवा निर्णयावर चालत नाही, असेही फडणवीस म्हणाले.

    Devendra Fadnavis alleges that not BJP but Utpal, rejected Bjp, some want to end his politics

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर भव्य चित्रपट निर्मिती; चौंडी मध्ये फडणवीस मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक बैठकीत निर्णय!!

    Devendra Fadnavis आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री फडणवीस