प्रतिनिधी
मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस प्रणित यूपीएचे राजकीय अस्तित्व नाकारल्यानंतर त्याचे पडसाद देशभरातील राजकीय वर्तुळात उमटले आहेत. ममता बॅनर्जी यांना शरद पवार यांनी साथ दिल्यामुळे महाराष्ट्रात तर त्याचे पडसाद अधिकच उमटले आहेत.Devendra Fadanavis targets mamata and Pawar over UPA issue
काँग्रेसला वगळून सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याच्या ममता आणि पवार यांच्या प्रयत्नांवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील टोला लगावून घेतला आहे. ज्यांना देशाच्या राजकारणातून काँग्रेसला बाजूला काढायचे आहे,
त्यांना महाराष्ट्रात सरकार चालवण्यासाठी काँग्रेस शिवाय पर्याय तरी आहे का…??, असा खोचक सवाल देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केला आहे. ममता बॅनर्जी या थेट बोलतात पण पवार बिटवीन द लाईन्स बोलतात, असा शेराही फडणवीसांनी मारला आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार चालविताना काँग्रेस शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना पर्यायच नाही, हेच फडणवीस यांनी अधोरेखित करून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला टोचले आहे.
Devendra Fadanavis targets mamata and Pawar over UPA issue
महत्त्वाच्या बातम्या
- मिर्झापूर मधील ललित हे पात्र निभावणारा कलाकार ब्रह्म मिश्रा याचे निधन
- कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटवर महाराष्ट्र सतर्क, आरोग्यमंत्री टोपे म्हणाले- पुढच्या एक-दोन दिवसांत येतील नवीन गाइडलाइन्स!
- ‘रेड नोटीस’ चित्रपटाचा नवा विक्रम, नेटफ्लिक्स सर्वात जास्त वेळा पाहिलेला चित्रपट
- सुरेश म्हात्रे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश