विशेष प्रतिनिधी
मुंबई – कोरोनासंबंधी संभाव्य लॉकडाऊनवरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे – पवार सरकारला गंभीर सूचना केल्या आहेत. जनतेचा उद्रेक होईल, हे लक्षात घेऊन निर्णय घ्या. जनतेला आर्थिक मदत करण्याचाही विचार करा, असा सल्लाही फडणवीस यांनी सरकारला दिला. devendra fadanavis suggests financial help be given to people during lockdown
सर्वपक्षीय बैठकीत देवेंद्र फडणवीस म्हणाले, की कोरोनाची चाचणी केल्यावर रिपोर्ट तात्काळ येतील मिळतील याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. रेमडिसिवीर संदर्भात खासगी हाँस्पिटलमध्ये उपलब्ध नाहीये. फक्त सरकारी हाँस्पिटलमध्ये उपलब्धता नको खासगी हाँस्पिटलमध्येही हवेत. रेमडिसिवीर तात्काळ कसे उपलब्ध कसे देता येईल.”
जनतेमधील उद्रेक लक्षात घेऊन निर्णय घ्यावा लागेल. काही जण तर आम्ही मेलो तरी चालेल पण आम्हाला धंदा करू द्यात असे म्हणणारे लोक आहेत, त्यासाठी आपण अशा लोकांचाही विचार करावा. ज्यांना सर्व कर भरावे लागतात आणि कर्जही फेडावें लागत आहे अशा परिस्थितीत कस घर चालवायचे, असा प्रश्न आहे. याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी सूचनाही फडणवीस यांनी केली.
काय काय चालवता येईल याचा विचार करून निर्णय घ्यावा. ज्यांचे काम सुरू करता येणार नाही त्यांच्यासाठीही काय करता येईल हे देखील पहावे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले…
- कोरोनाची चाचणी केल्यावर रिपोर्ट तात्काळ येतील मिळतील याची व्यवस्था करणं आवश्यक आहे. रेमडेसीविर संदर्भात खासगी हाँस्पिटलमध्ये उपलब्ध नाहीये.. फक्त सरकारी हाँस्पिटलमध्ये उपलब्धता नको खासगी हाँस्पिटलमध्येही हवेत.
- ज्यांचे काम सुरू करता येणार नाही त्यांच्यासाठीही काय करता येईल हे देखील पहावे.
- लहान उद्योजक आणि हातावर पोट असणार्यांचा देखील विचार करावा. आत्ताची परीस्थितीत आर्थिक बोजा वाढला तरी अशा लोकांसाठी काहीतरी आर्थिक मदत करण्यासाठी विचार करावा.
- वीज बील संदर्भातही विचार करावा वीज कनेक्शन कट करत आहेत…ते होऊ देऊ नये. नागरिकांचे उन्हाळ्यात हाल करू नयेत.
- केश कर्तनालय यांच्या समोर असा प्रश्नं आहे की काय खायचं त्यांचाही विचार करावा. त्यांच्यासाठी काय सूट देता येईल का…आपण सर्वांची नुकसान भरपाई करता येणार नाही. पण जगता येईल याचा विचार करावा. लोकांचा उद्रेक टाळण्यासाठी नियोजन करावं लागेल. परिस्थिती समजून निर्णय घ्यावा.
devendra fadanavis suggests financial help be given to people during lockdown
हे ही वाचा
- कोरोना लसीकरणातही ठाकरे – पवार सरकारच्या ऊर्जा मंत्री नितीन राऊतांना दिसला तथाकथित मनूवाद!!
- महाराष्ट्र सरकारची ब्रेक द चेन नियमावलीमध्ये नव्या बदलांचा समावेश; सरकारी, खासगी सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा
- रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन दुप्पट करा , आरोग्यमंत्री टोपे यांचे कंपन्यांना आवाहन ; ‘एमआरपी’ ही कमी करण्याचा सल्ला
- काँग्रेस – बद्रुद्दीन अजमल यांच्या पक्षाचे एकाच वेळी “हात वर” आणि “खिसे खालीही”!!; २० लोकांचा फेअरमाऊंटमधील निवासाचा खर्च काँग्रेस करणार
- राष्ट्रपती – पंतप्रधानही रूग्णालयात लस घेतात, मग महाराष्ट्रातले नेते कोण लागून गेलेत, की त्यांना घरी जाऊन लस द्यावी!!; मुंबई हायकोर्ट संतापले