• Download App
    फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक : आपणच इतरांना मुख्यमंत्री बनवतो ही बाकीच्यांची घमेंड तोडली!!; वाघाची गाडी सत्तेला जोडली!!Devendra Fadanavis masterstroke : made shivsainik eknath shinde chief minister

    फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक : आपणच इतरांना मुख्यमंत्री बनवतो ही बाकीच्यांची घमेंड तोडली!!; वाघाची गाडी सत्तेला जोडली!!

    एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड करून देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार मास्टर स्ट्रोक मारला आहे. आपण स्वतः कोणते पद स्वीकारत नाही, तर इतरांना मुख्यमंत्री बनवतो, मंत्री बनवतो, अशी महाराष्ट्रातल्या नेत्यांची घमेंड झाली होती, ती देवेंद्र फडणवीस यांनी ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये राहून तोडून टाकली आहे!! Devendra Fadanavis masterstroke : made shivsainik eknath shinde chief minister

    – रिमोट कंट्रोल नव्हे

    यासाठी फडणवीस यांना आपण रिमोट कंट्रोल आहोत, तेल लावलेले मल्ल आहोत, आपण मंत्रिमंडळ बनवू शकतो, मोडू शकतो, असे काहीही सूचित करावे लागले नाही किंवा सांगावे लागले नाही. देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय धीमी आणि दमदार खेळी करत एकनाथ शिंदे यांच्याकडे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे नेतृत्व सोपवून एक प्रकारचा नैतिक दबदबा तयार केला आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाकडे उरलेले शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे नैतिकदृष्ट्या उभे करण्याची राजकीय किमया देखील साधून घेतली आहे.

    – 2019 परत फोन उचलला असता तर

    2019 च्या निवडणुकीनंतर आपला फोन मातोश्रीवर उचलला गेला असता तरी देखील शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकला असता हेच एक प्रकारे फडणवीस यांनी आपल्या राजकीय कृतीतून सूचित केले आहे.

    – शिंदेंकडून आभार

    स्वतः एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनू शकले असते. परंतु, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आपल्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवले आणि स्वतः मंत्रिमंडळा बाहेर राहून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल फडणवीस यांचे आभारही मानले आहेत.

    – फडणवीसांचे नेतृत्व मुख्यमंत्री पदापेक्षा मोठे

    पण या आभारापलिकडे फडणवीस यांनी आपले राजकीय नेतृत्वात सिद्ध करून दाखवले आहे. खरोखर एकनाथ शिंदे यांच्या गटाला उपमुख्यमंत्री पद आणि जास्तीची मंत्री पदे सोपवून त्यांना स्वतःला मुख्यमंत्रीपद नक्की स्वीकारता आले असते. मी पुन्हा येईल ही जिद्द पूर्ण करता आली असती. ते फारसे अवघड नव्हते. पण भारतीय जनता पार्टीच्या काही विशिष्ट धोरणांनी आणि विशिष्ट राजकीय हेतूंनी फडणवीस यांनी स्वतःच्या कक्षेत आलेले मुख्यमंत्रीपद स्वतःहून एकनाथ शिंदे यांच्याकडे दिल्याचे दिसत आहे. अर्थात राजकारणात हा दुर्मिळ गुण मानला जातो.

    – फडणवीसांपुढे मोठी संधी

    याचा दुसराही अर्थ असा होऊ शकतो की भविष्यकाळात स्वतः देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीच्या आणि केंद्र सरकारच्या राजकारणात मोठे पद भूषवू शकतात. त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापेक्षा मोठे पद भाजप मधून दिले जाऊ शकते. देवेंद्र फडणवीस यांनी वयाच्या 52 व्या वर्षी आपल्याला आपल्या स्वतःला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापेक्षाही वरच्या पदावर नेऊन ठेवले आहे. मराठी माध्यमांनी महाराष्ट्राचे चाणक्य मानले गेलेल्या आणि तेल लावलेला मल्ल असे बिरूद लावलेल्या महानेत्यालाही फडणवीस यांचीही राजकीय किमया साधता आलेली नाही. उलट महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना एकनाथ शिंदे यांना बाजूला सारून दस्तुरखुद्द ठाकरे घराण्यातील प्रमुखाला मुख्यमंत्री नेमावे लागले आणि अडीच वर्षात त्या मुख्यमंत्र्याला पायउतार करावे लागले. हा राजकीय विक्रम देखील ठाकरे घराण्याच्या नावावर पहावा लागला आहे.

    – भाजपची दीर्घकालीन खेळी, मोठी संधी

    त्या उलट फडणवीसांनी आपल्या राजकीय कृतीतून एक दीर्घकालीन खेळी महाराष्ट्रात रचली आहे. शिवसेना नावाचा संपूर्ण विधिमंडळ पक्ष एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आता उभा राहू शकतो. सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करून दाखवणे ही भाजपच्या नेत्यांसाठी अवघड गोष्ट वाटत होती. ती फडणवीसांनी सोपी करून दाखवली आहे. आपण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाबाहेर राहून त्यांना साथ देऊ, असे जरी फडणवीस यांनी सांगितले असले तरी भविष्यात त्यांच्यापुढे मोठी राजकीय संधी उपलब्ध असणार ही बाब अधोरेखित केली पाहिजे.

    Devendra Fadanavis masterstroke : made shivsainik eknath shinde chief minister

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस