• Download App
    फडणवीस - चंद्रकांतदादा - राऊत यांच्यातला कॉमन फॅक्टर; दोन दिवसात खंजिरी राजकारणाची आठवण!! Devendra Fadanavis, chandrakant patil and Sanjay Raut remember back stabbing politics in maharashtra

    फडणवीस – चंद्रकांतदादा – राऊत यांच्यातला कॉमन फॅक्टर; दोन दिवसात खंजिरी राजकारणाची आठवण!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : गेल्या दोन-तीन दिवसांत सुरुवातीला जितेंद्र आव्हाड प्रकरण आणि नंतर आफताब – श्रद्धा लव्ह जिहाद प्रकरण यावर सगळ्या मीडियात बातम्या आणि चर्चांची भरमार असताना 2 दिवसांमध्ये 3 राजकारण्यांनी महाराष्ट्रातल्या खंजिरी राजकारणाच्या अर्थात पाठीत खंजीर खुपसण्याच्या आठवणी काढल्या आहेत. या आठवणी अर्थातच वेगवेगळ्या आहेत. Devendra Fadanavis, chandrakant patil and Sanjay Raut remember back stabbing politics in maharashtra

    साम टीव्ही सामर्थ्य महाराष्ट्राचे कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या खंजिरी राजकारणाची आठवण काढली. 2019 च्या निवडणुकीत जनतेने शिवसेना-भाजप महायुतीला पूर्ण बहुमताचा कौल दिला असताना आपल्या पाठीत खंजीर खुपसला. जनतेशी विश्वासघात केला आणि म्हणून महाराष्ट्रात 2022 मध्ये सत्ता बदलून आपण त्या खंजिरी राजकारणाचा बदला घेतला, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून केले. फडणवीसांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातल्या खंजिरी राजकारणाची आठवण काढायला पुन्हा सुरुवात झाली.



    साम टीव्ही च्याच सामर्थ्य महाराष्ट्राचे कार्यक्रमात शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनीही महाराष्ट्रातल्याच खंजिरी राजकारणाची आठवण काढली. पण ती फार जुन्या राजकारणाची होती. 1978 मध्ये शरद पवारांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांचे सरकार पाडले आणि स्वतः 39 आमदार फोडून सरकार बनवले. ते मुख्यमंत्री झाले. शरद पवारांवर आपण पीएचडी करणार आहोत, ती शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर कसा खुपसला?? आणि आमदार कसे फोडले??, या विषयावर करणार आहोत, असे चंद्रकांत दादा पाटील म्हणाले. शरद पवारांनी सहकारी संस्था किती काढल्या??, त्यात कर्मचारी किती?? त्याचे भाग भांडवल किती??, वगैरे विषयांवर आपण पीएचडी करणार नाही, तर शरद पवारांच्या खंजीर खुपसण्याच्या राजकारणावर पीएचडी करणार असल्याचा खोचक खुलासा चंद्रकांत दादांनी केला. त्यामुळे खंजिरी राजकारणाची दुसरी पण मूळ आठवण निघाली.

    1039 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात नुकतेच तुरुंगात जाऊन आलेले शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या खंजिरी राजकारणाची तिसरी आठवण काढली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर यायचे असेल, तर हातातला खंजीर बाजूला ठेवून मगच स्मारकावर या, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. राऊतांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या मूळ खंजिरी राजकारणाची तिसरी आठवण काढली गेली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण भारताचे नेते आहेत. सगळ्यांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे त्यांच्या स्मारकावर हातातले खंजीर बाजूला ठेवून या, असे संजय राऊत म्हणाले.

    गेली दोन दिवस सगळी प्रसार माध्यमे जितेंद्र आव्हाड आणि आफताब + श्रद्धा यांचा लव्ह जिहाद आणि त्यातून झालेली श्रद्धाची निर्घृण हत्या या बातम्यांनी भरली असताना 3 राजकीय नेत्यांनी महाराष्ट्रातल्या खंजीर खुपसण्याच्या राजकारणाची आठवण काढली, त्याकडे काहीसे दुर्लक्ष झाले हे मात्र खरे.

    Devendra Fadanavis, chandrakant patil and Sanjay Raut remember back stabbing politics in maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!