• Download App
    कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या ठाकरे - पवार सरकारने लपवल्याचा देवेंद्र फडणवीसांचा आरोप|devendra fadanavis allaged govt has hidden corona deaths

    कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या ठाकरे – पवार सरकारने लपवल्याचा देवेंद्र फडणवीसांचा आरोप

    प्रतिनिधी

    परभणी : संपूर्ण राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या राज्य सरकारने लपविल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.devendra fadanavis allaged govt has hidden corona deaths

    देवेंद्र फडणवीस हे बुधवारी दुपारी परभणी शहराच्या दौ-यावर दाखल झाले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व अन्य वरिष्ठ अधिका-यांबरोबर चर्चा केल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी हितगुज केले.



    राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या सरकारने लपविल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. पहिल्या आणि दुस-या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण दगावले.

    ठकरे – पवार सरकारचे अपयशच त्यामागे कारणीभूत होते. परंतू सरकारने हे अपयश झाकण्याकरिता मृत्यूच्या संख्येचा आकडा लपविण्याचा प्रयत्न केला, असे नमुद केले.

    कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा नेमका आकडा कळाला पाहिजे. त्यासाठी आपण सरकारला जाब विचारू तसेच कोरोनाच्या या आपत्तीत सरकारने केलेल्या अक्षम्य अशा चुकाचाही शोध घेऊ, कोरोना अंतिम टप्प्यात आहे.

    प्रादुर्भाव हळूहळू कमी होतो आहे. परंतु, या आपत्तीत साहित्य खरेदी असो, काळा बाजार असो, हितसंबंधी व्यक्तींना दिलेल्या कंत्राटांचे प्रकरण असो आदी बाबत चौकशीची मागणी केली जाईल, असे फडणवीस यांनी नमूद केले.

    devendra fadanavis allaged govt has hidden corona deaths

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस