• Download App
    नवाब मलिक तुम्हाला नियती माफ करणार नाही , निलेश राणेंनी साधला निशाणाDestiny will not forgive you Nawab Malik, Nilesh Rane took aim

    नवाब मलिक तुम्हाला नियती माफ करणार नाही , निलेश राणेंनी साधला निशाणा

    एक अल्पसंख्याक उमेदवार बनावट दाखले सादर करुन अनुसुचित प्रवर्गातून अधिकारी झाला,असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.Destiny will not forgive you Nawab Malik, Nilesh Rane took aim


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : समीर वानखेडे यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली असून एका गरीब अनुसूचित प्रवर्गाच्या पात्र विद्यार्थ्याची नोकरी त्यांनी हिसकावून घेतली आहे. त्यांचा जन्माचा दाखला आणि जात प्रमाणपत्र खोटं निघालं तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. एक अल्पसंख्याक उमेदवार बनावट दाखले सादर करुन अनुसुचित प्रवर्गातून अधिकारी झाला,असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.



     

    दरम्यान भाजप नेते निलेश राणे यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांना नियती माफ करणार नाही अस ट्विट नीलेश राणे यांनी केलं आहे. निलेश राणे यांनी ट्विट च्या माध्यमातून नवाब मलिक यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

    एका ड्रग पार्टीमध्ये रेड पडली, सेलिब्रिटीचा पोर पकडला गेला, गुन्हा मान्य केला, ड्रग नेक्सस उघडणार होतं तेवढ्यात एक मंत्री ड्रग माफियाची बाजू घेऊ लागला आणि आज ते मॅटर ड्रग नेक्ससचं नसून ज्या अधिकाऱ्यांनी रेड मारली त्याच्या जातीवर आलंय. असं नीलेश राणे यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.

    Destiny will not forgive you Nawab Malik, Nilesh Rane took aim

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस