मंगळवारी कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती आणि शिक्षक आमदार विक्रम काळे आणि सुधीर तांबे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली.Despite the reversal of the month in the state, 3361 teachers are not paid
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील तब्बल ३३६१ शिक्षकांचे अद्याप वेतन न झाल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.अर्धा महिना उलटला तरी डिसेंबरचे वेतन अद्याप न झाल्याने अनुदानित शाळेतील शिक्षकांनी मंगळवारी शिक्षक आमदारांसोबत मंत्रालयात ठिय्या मांडला.
त्यामुळे गुरुवारपर्यंत शिक्षकांचे वेतन न काढल्यास २५ जानेवारीपासून राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिक्षकांकडून देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती आणि शिक्षक आमदार विक्रम काळे आणि सुधीर तांबे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिक्षकांचे वेतन काढण्याबाबत होत असलेल्या विलंबाची तक्रार केली.
दरम्यान शिक्षकांच्या तक्रारीची दखल घेत शिक्षणमंत्र्यांनी सचिवांना तातडीने सूचना देत आंदोलनाची गरज नसल्याचे सांगितले; मात्र वेतनासंदर्भातील शासन आदेश आजच काढावा, यासाठी आमदार विक्रम काळे व सुधीर तांबे यांनी कृती समितीच्या पदाधिकांसह मंत्रालयातच ठाण मांडून बसले, तसेच टेबल टु टेबल पाठपुरावा करत याच आठवड्यात वेतन खात्यावर जमा होईल, यासाठी प्रयत्न सुरू केले.यावेळी कृती समितीचे संजय डावरे, धनाजी साळुंखे, पुंडलीक रहाटे, गुलाब पाल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Despite the reversal of the month in the state, 3361 teachers are not paid
महत्त्वाच्या बातम्या
- भारतीय रेल्वे सेवेसाठी सदैव तत्पर, २३ मिनिटांत बाळाला उपलब्ध करून दिले गाईचे दूध
- मेहबुबा मुफ्ती यांचा भाजपविरुध्द द्वेषयुक्त फुत्कार, उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळविण्यापेक्षा मोठी बाब
- समाजवादी पक्षातील बंडखोराला उमेदवारी देऊन ओवेसींनी फुंकले रणशिंग, उत्तर प्रदेशात एमआयएमने दिला हिंदू उमेदवार
- तीर्थक्षेत्र विकासाची कामे कालबद्ध व्हावीत डॉ.नीलम गोऱ्हे यांची सुचना