• Download App
    Deputy Chief Minister Devendra Fadnavis response to Uddhav Thackerays criticism

    ‘’उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे’’ देवेंद्र फडणवीसांचा पलटवार!

    ‘’मग अशा मानसिकतेमधून जर एखादा व्यक्ती बोलत असेल, तर…’’असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अत्यंत खालच्या पातळीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नागपूरात टीका केली. शिवसैनिकांना संबोधताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस नागपूरला लागलेला कलंक आहेत, अशा शब्दांत शरसंधान साधले. उद्धव ठाकरेंच्या या टीकेवरून महाराष्ट्र भाजपमध्ये प्रचंड संताप उसळला असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार अत्यंत कठोर शब्दात उद्धव ठाकरेंची निंदा करून त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. याशिवाय फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. Deputy Chief Minister Devendra Fadnavis response to Uddhav Thackerays criticism

    प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, ‘’खरं म्हणजे मला या गोष्टीचं अत्यंत दु:ख आहे, की आमचे आजचे विरोधक आणि माजी मित्र उद्धव ठाकरे यांच्यावर विचारांवर आणि वर्तवणुकीची मला कीव करावीशी वाटत आहे. आताच्या राजकीय परिस्थितीचा फारच विपरीत परिणामा झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे कदाचित त्यांना मानोसपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा लागले, अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आहे.’’

    याचबरोबर, ‘’मग अशा मानसिकतेमधून जर एखादा व्यक्ती बोलत असेल, तर मला असं वाटतं की त्यावर प्रतिक्रिया देणं देखील योग्य नाही. ही मानसिक स्थिती आहे. आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. त्यावर प्रतिक्रिया न दिलेलीच बरी.’’ अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

    उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? –

    “देवेंद्र फडणवीस हे नागपुराला लागलेले कलंक आहेत. आता सांगत आहेत, उद्धव ठाकरेंनी पाठित खंजीर खुपसला म्हणून आम्ही यांच्याबरोबर गेलो. पहिलं उद्धव ठाकरेच्या पाठित खंजीर कुणी खुपसला? २०१४ ते २०१९ तुमच्याबरोबर सत्तेत होतो. २०१४ साली शिवसेनेनं नाहीतर, तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे.” अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीका  केली होती.

    Deputy Chief Minister Devendra Fadnavis response to Uddhav Thackerays criticism

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस