‘’प्रकाश आंबेडकर नवा इतिहास लिहित असतात’’ असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीत नुकतेच राष्ट्रीय पातळीवरील जबाबदाऱ्यांचे वाटप केले गेले, यामध्ये ओबीसी नेत्यांना डावललं गेल्याचे दिसून आले, यावरून फडणवीसांनी निशाणा साधला आहे. Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticized NCP
फडणवीस म्हणतात, ‘’राष्ट्रवादीत ओबीसी नेते नाहीत, असे मी म्हटले नाही. राष्ट्रवादीला दाखविण्यापुरते ओबीसी नावे लागतात आणि संवैधानिक पदे द्यायची वेळ आली की त्यांना ओबीसी दिसत नाही. राष्ट्रवादीचे नेते खासगीत जे बोलतात तेच मी जाहीरपणे बोललो, ते कदाचित पवारांना आवडले नसेल.’’ तसेच, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून महापालिका अधिकार्यांना झालेल्या मारहाणीसंदर्भात विचारले असता फडणवीस म्हणाले की, ‘’कुणी कायदा हातात घेणार असेल तर त्यावर आम्ही कारवाई करु.’’
याशिवाय, ‘’भारताला राजकीय स्वातंत्र हे 15 ऑगस्ट 1947 रोजीच मिळाले, हे सत्य आहे. पण, अखंड भारत हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. पण, अखंड भारताचे स्वप्न पाहणार्यांनाही स्वातंत्र्यांची तारीख बदलता येणार नाही.’’, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
याचबरोबर, ‘’प्रकाश आंबेडकर नवा इतिहास लिहित असतात. परवा ते औरंगजेबच्या कबरीवर गेले होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ हा औरंगजेबाने केला, हे ऐतिहासिक सत्य आहे. धर्म बदलण्यासाठी दबाव आल्यानंतर त्यांनी अत्याचार सहन केले पण, त्यांनी ती मागणी मान्य केली नाही. हा इतिहास उभ्या जगाला माहिती आहे, तो बदलण्याचा प्रयत्न कुणीही करू नये.’’, असेही फडणवीस यांनी यावेळी बोलून दाखवले.
Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticized NCP
महत्वाच्या बातम्या
- कुस्तीपटूंचे आंदोलन संपवण्याची घोषणा; साक्षी-विनेश आणि बजरंग म्हणाले- आता लढाई रस्त्यावर नाही, तर कोर्टात लढू
- आपने म्हटले- राहुल गांधींनी मोठे मन दाखवावे, मोहब्बत की दुकानवर सवाल; काँग्रेसचा पलटवार- केजरीवाल यांना तुरुंगाची भीती
- पंतप्रधान मोदींना मागील ९ वर्षांत जगभरातील देशांनी प्रदान केलेले सर्वोच्च पुरस्कार तु
- पतीने विकत घेतलेल्या संपत्तीतही पत्नीचा समान हक्क; मद्रास हायकोर्टाने म्हटले- पैसा पतीने कमावला असला तरी पत्नीमुळेच ते शक्य