• Download App
    Girish Bapat Passed Away : राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले – देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis condoled the demise of BJP MP Girish Bapat

    Girish Bapat Passed Away : राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले – देवेंद्र फडणवीस

    पुण्याच्या विकासात गिरीश बापटांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

    प्रतिनिधी

    मुंबई : भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचे आज (बुधवार) पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. एक सर्वसमावेशक नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. केवळ भाजपाच नव्हे तर अन्य पक्षातील नेत्यांनाही ही बातमी ऐकल्यानंतर अतिशय दु:ख होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटरवर व्हिडीओच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. Deputy Chief Minister Devendra Fadnavis condoled the demise of BJP MP Girish Bapat

    देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘’भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे. पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे.’’


    भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निधन, संघ स्वयंसेवक, नगरसेवक ते खासदार, जाणून घ्या गिरीश बापटांचा राजकीय प्रवास


    याचबरोबर ‘’देशाच्या सार्वभौम सभागृहातील त्यांचा खासदार म्हणून प्रवेश हा तळागाळातून होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री आणि नंतर खासदार. २०१४ ते २०१९ या माझ्या सरकारच्या कार्यकाळात ते संसदीय कामकाज मंत्री होते. त्यांचा हजरजबाबीपणा आणि सर्व पक्षांत समन्वय, यामुळे कोणताही प्रसंग आला तरी योग्य मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती. पुण्याच्या समग्र विकासाचे चिंतन करीत असतानाच कामगार आणि शेतकरी हे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत असताना अमरावती जिल्ह्यात त्यांनी शेती सुद्धा केली. प्रत्येक कामात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला.’’ असंही फडणीस म्हणाले आहेत.

    याशिवाय, ‘’पुण्याच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. या आजारालाही त्यांनी लढवय्यासारखी झुंज दिली. यातून ते बाहेर येतील, अशी आशा होती. पण, आज ते आपल्याला सोडून गेले. भारतीय जनता पक्षाची ही अपरिमित हानी आहे. एक उत्तम संसदपटू, उत्तम वक्ते आपल्यातून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकिय आणि सर्व कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे.’’ अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

    Deputy Chief Minister Devendra Fadnavis condoled the demise of BJP MP Girish Bapat

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!