गुन्ह्यात खोटी साक्ष व चुकीच्या पद्धतीने तपास करावा, यासाठी एका पोलिस अधिकाऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे नाव सांगून दबाव टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. Deputy chief minister Ajit Pawar son Parth Pawar name used by accused and pressurise police in one case
विशेष प्रतिनिधी
पुणे : गुन्ह्यात खोटी साक्ष व चुकीच्या पद्धतीने तपास करावा, यासाठी एका पोलिस अधिकाऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे नाव सांगून दबाव टाकण्यात आला. हा प्रकार हिंजवडी येथे उघडकीस आला आहे.
याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक नकुल न्यामने (वय ४७) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अश्रफ मर्चंट (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) या मोबाईलधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील अमित कलाटे याच्यावर जमीन व्यवहारात फसवणूक आणि सावकारी कायद्यानुसार हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
व्याजाचे पैसे न दिल्याने महागडी मोटार ओढून नेल्याचा आरोप कलाटे याच्यावर आहे. दरम्यान, २२ जानेवारी रोजी आरोपीने फिर्यादी न्यामने यांना फोन केला.”मी पार्थ भाऊंचा मित्र आहे, तुमच्याकडे अमित कलाटेचा विषय आहे का ? तुमचा त्या विषयात काय स्टॅन्ड आहे, मी आणि पार्थ पवार यांचे पीए सागर जगताप हे कलाटे याचे खास मित्र आहोत. तुम्हाला मी सांगतोय ते ऐका, वाटल्यास तुम्हाला मी जिजाई बंगला, भोसले नगर येथे थेट समोर घेऊन जाईन, अमितचा काय असेल तो विषय तुम्ही मिटवून घ्या, नाहीतर विषय वरपर्यंत घेऊन जावे लागेल.
राष्ट्रवादीचे प्रवक्ता उमेश पाटील यांनी देखील मला तुम्हाला विचारून घ्यायला सांगितले आहे, असे बोलून आरोपीने फिर्यादी यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर पुन्हा सोमवारी फिर्यादी हे कर्तव्यावर असताना आरोपीने त्यांना फोन करून दाखल गुन्ह्यात खोटी साक्ष व चुकीच्या पद्धतीने तपास करावा, यासाठी राजकीय पक्षाच्या मोठ्या पदावरील नावाचा वापर करून दबाव टाकल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सागर काटे करीत आहेत.
Deputy chief minister Ajit Pawar son Parth Pawar name used by accused and pressurise police in one case
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : आसाम- मेघालयचा 50 वर्षे जुना सीमावाद सुटला, हिमंता बिस्वा सरमा आणि कॉनराड संगमा यांनी दिल्लीत सीमा करारावर केली स्वाक्षरी
- कार्यपध्दतीच संशयास्पद असल्याने जागतिक विषमता अहवाल सदोष, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले स्पष्ट
- पत्रकार राणा अयूबला लंडनला जाताना मुंबई विमानतळावरच रोखले, कोरोनाच्या नावाखाली
- ओएनजीसी लिमिटेड मधील 1.5% शेअर्स विकून सरकार उभारणार 3 हजार कोटी रुपये
- काश्मीर फाइल्सवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी सहारणपूरमधील मौलानांची पत्रकार परिषद, प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धक्काबुक्की