विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : देशातील एकही व्याघ्र प्रकल्प सद्यःस्थितीत बंद नाही. कोरोना संसर्गामुळे बंद करण्यात आलेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. Demand for Tadoba Tiger Project to be opened for tourists
या संदर्भात मुनगंटीवार यांनी आज मदत व पुनर्वसन विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता आणि जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याशी चर्चा केली. शिष्टमंडळात संजय मानकर, संजय ढिमोले, आशिष पुराणिक, शुभम ढिमोले आदी होते.
मुनगंटीवार म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. कोरोनाची रूग्णसंख्या आता आटोक्यात आली असल्याने व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्यास आता कोणतीही हरकत नाही. व्याघ्र प्रकल्प बंद असल्यामुळे परिसरातील रिसोर्ट व्यावसायिक तसेच त्यावर अवलंबून असलेल्या घटकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. देशातील एकही व्याघ्र प्रकल्प सद्यःस्थितीत बंद नाही. अशा परिस्थीतीत केवळ ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बंद असणे संयुक्तिक नाही. हा व्याघ्र प्रकल्प त्वरीत पर्यटकांसाठी खुला करण्यात यावा.
व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्याबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन गुप्ता यांनी दिले.
Demand for Tadoba Tiger Project to be opened for tourists
महत्त्वाच्या बातम्या
- ऑनलाइन – ऑफलाईन परीक्षांचा घोळ : अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लाठीमार का?; सोशल मीडियावर संताप!!
- संतप्त ममतांनी थेट राज्यपाल धनखड यांना केले ट्विटरवर ब्लॉक!
- पुण्यातील ५८ प्रभागांची नावे जाहीर
- ऑनलाईन परीक्षेसाठी दहावी, बारावीचे विद्यार्थी मुंबईसह इतर शहरांमध्ये रस्त्यावर, पोलिसांचा लाठीमार!!; हिंदुस्थानी भाऊवर ठपका
- दोघांचे भांडण तिसऱ्याचा तोटा!!; मुंबई महापालिकेत भांडण शिवसेना-भाजपचे; तोट्यात काँग्रेस!!