वृत्तसंस्था
मुंबई : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना फोन करून मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची चौकशी केली. उद्धव ठाकरे सध्या रुग्णालयात असून त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यांच्यावर रिलायंस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे राजनाथ सिंग यांनी रश्मी ठाकरे यांना फोन करून उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची चौकशी केली. Defense Minister Rajnath Singh’s phone call to Rashmi Thackeray; Inquiry into CM’s health
राजनाथ सिंग आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुंबई बंदरात भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस विशाखापट्टणम हिचे अनावरण केले. या दौर्यात दरम्यानच राजनाथ सिंग यांनी रश्मी ठाकरे यांना फोन करून मुख्यमंत्री यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. रश्मी ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीविषयी माहिती देऊन संरक्षणमंत्र्यांचे आभारही मानले आहेत.
Defense Minister Rajnath Singh’s phone call to Rashmi Thackeray; Inquiry into CM’s health
महत्त्वाच्या बातम्या
- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; रत्नागिरीच्या टिळक जन्मस्थान स्मारकाची दुरवस्था, कौलेही उडाली! 4.50 कोटी गेले कुठे?
- महाविकास आघाडी सरकारची हिंमत असेल तर रझा अकादमीवर बंदी घालावी; देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान
- विनोद तावडे यांना भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी बढती; बावनकुळे यांच्यासारखे राजकीय पुनर्वसन
- युरोपमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेचा तडाखा, ऑस्ट्रियात लॉकडाऊन; जर्मनीमध्ये संकट
- पुण्याच्या प्रसिद्ध हॉटेलमधील वेटरची इमारतीवरून उडी मारून लाईव्ह आत्महत्या; घटनेमुळे उडाली खळबळ