Ramdas Athwale : उत्तर प्रदेशात भाजपमधून जे नेते चालले आहेत, त्यामुळे भाजपला फटका बसेल असं अजिबात नाही. उलट जे भाजप सोडून जात आहेत त्यांचेच नुकसान होईल, भाजपला काही फरक पडणार नाही. भाजप 300 जागा जिंकणार. विरोधकांसह अखिलेश यादव यांनी कितीही प्रचार केला तरी भाजपला हरविणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही, असा वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. Defeating BJP in UP is not an easy task, being a nationalist party does not make it a national party says Ramdas Athwale
प्रतिनिधी
कल्याण : उत्तर प्रदेशात भाजपमधून जे नेते चालले आहेत, त्यामुळे भाजपला फटका बसेल असं अजिबात नाही. उलट जे भाजप सोडून जात आहेत त्यांचेच नुकसान होईल, भाजपला काही फरक पडणार नाही. भाजप 300 जागा जिंकणार. विरोधकांसह अखिलेश यादव यांनी कितीही प्रचार केला तरी भाजपला हरविणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही, असा वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे कल्याणनजीक गोवेली येथील जीवनदीप कॉलेजमध्ये प्राचार्य धनाजी गुरव यांच्या शोकसभेसाठी आले होते. या कार्यक्रमात भाजप आमदार किसन कथोरे, कॉलेज संचालक रवींद्र घोडविंदे आणि रिपाइंचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी अखिलेश यादव यांना टोला लागावला. तसेच अन्य राजकीय मुद्यावर मत मांडले.
ते पुढे म्हणाले की, प्रकाश आंबडेकरांशिवाय रिपाइं ऐक्याला अर्थ नाही. मतं खाण्याच्या राजकारणापेक्षा मत घेऊन निवडून येण्याचं राजकारण करण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी विचार करावा, असा सल्लाही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला. काही दिवसांपूर्वी रिपाइं नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबडेकर यांना सोडून ऐक्य करत असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर रामदास आठवले यांनी जोगेंद्र कवाडे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ऐक्याची भूमिका चांगली आहे. ऐक्य व्हावे या मागणीला पाठिंबा आहे. प्रकाश आंबडेकर यांच्याशिवाय ऐक्य व्हावे या मागणीशी मी सहमत नाही. त्यांना डावलून ऐक्य करण्यात अर्थ नाही, अस माझं मत आहे, असंही ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांना ऐक्याचा अध्यक्ष केल्यास त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करण्याची माझी तयारी आहे, वंचित बहुजन आघाडीने चांगली मतं घेतली, मात्र मतं खाण्याच्या राजकारणामुळे समाजाचा फायदा होणार नाही, त्यासाठी निवडून येत सत्ता मिळवणं आवश्यक आहे. मतं खाण्याच्या प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणाला माझा विरोध आहे, मतं खाण्याच्या राजकारणापेक्षा मत घेऊन निवडून येण्याचं राजकारण करण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी विचार करणं आवश्यक असल्याचा सल्ला आठवले यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की, नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला देशात मान्यता नाही. ही पार्टी महाराष्ट्रापुरती आहे. देशातील काही राज्यांत पवार साहेबांचे संघटन आहे. मोठ्या प्रमाणात हे संघटन नाही. राष्ट्रवादी नाव आहे म्हणून तो राष्ट्रीय पक्ष होत नाही, या भाजपच्या मताशी मी सहमत आहे असेही आठवले यांनी म्हटले.
Defeating BJP in UP is not an easy task, being a nationalist party does not make it a national party says Ramdas Athwale
महत्त्वाच्या बातम्या
- लष्कर दिनानिमित्त लष्करप्रमुख एमएम नरवणे यांचा चीनला पुन्हा इशारा, म्हणाले- आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका!
- Assembly Election 2022 : मोठ्या सभांवर 22 जानेवारीपर्यंत बंदी, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
- आर्थिक संकटात असलेल्या श्रीलंकेला भारताकडून मदतीचा हात, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले अनेक करार
- कोरोनामुळे पश्चिम बंगालमध्ये चार नगरपालिकांच्या निवडणुका लांबल्या, आता राज्यात 31 जानेवारीपर्यंत निर्बंध
- मोठा निर्णय : आता दरवर्षी 23 जानेवारीपासून साजरा होणार प्रजासत्ताक दिनाचा उत्सव, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीला जोडून होणार कार्यक्रम