• Download App
    शशिकांत शिंदे यांचा एक मताने पराभव राष्ट्रवादीच्या कार्यालयावर समर्थकांची दगडफेक|Defeat of Shashikant Shinde by one vote; Supporters throw stones at NCP office after Satara Bank election result

    WATCH : शशिकांत शिंदे यांचा एक मताने पराभव राष्ट्रवादीच्या कार्यालयावर समर्थकांची दगडफेक

    विशेष प्रतिनिधी

    सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे केवळ एक मतांनी पराभूत झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करून पराभवाचा निषेध केला.Defeat of Shashikant Shinde by one vote; Supporters throw stones at NCP office after Satara Bank election result

    जावळी प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघात आमदार शशिकांत शिंदे यांना २४ मते मिळाली. तर ज्ञानदेव रांजणे २५ मते घेऊन विजयी झाले आहेत. हा पराभव शिंदे यांच्या समर्थकांचा जिव्हारी लागला. या पराभवाचे खापर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विशेषतः अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर फोडले आहे.



    या दोघांनी शिंदे यांना विजयी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, ते प्रत्यक्षात साकारले नाही. शिंदे यांचा एक मताने पराभव झाला. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली.दरम्यान, सातारा जिल्हा बँक निवडणुकीतील कराड तालुका सोसायटी गटात राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रतिष्ठेच्या लढाईत आठ मतांनी विजय मिळवला.

    त्यांनी संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या लढतीत राज्याचे माजी सहकार मंत्री स्व. विलासराव पाटील – उंडाळकर यांचे सुपूत्र जिल्हा परिषद सदस्य ॲड. उदयसिंह पाटील यांचा पराभव केला. मागील सहा दशकांपासून एकतर्फी वर्चस्व असणाऱ्या कराड तालुका सोसायटी गटात स्व. विलासराव पाटील – उंडाळकर यांच्या निधनानंतर पहिल्याच निवडणुकीत उंडाळकर गटाचे वर्चस्व संपुष्टात आले असून आता नवीन अध्यायास प्रारंभ झाला.

    सातारा जिल्हा बॅंक : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचा पराभव जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघ निकाल
    एकूण मते – 49
    झालेली मते – 49
    वैध मते – 48
    अवैध मते – 01
    उमेदवार आणि मिळालेली मते
    शशिकांत शिंदे- 24
    ज्ञानदेव रांजणे- 25
    विजयी उमेदवार – ज्ञानदेव रांजणे
    मतांचे लीड – 1

    • शशिकांत शिंदे यांचा एक मताने पराभव
    • सातारा जिल्हा बँक निवडणुकीत पराभव
    • आमदार शशिकांत शिंदे यांना २४ मते
    • ज्ञानदेव रांजणे २५ मते घेऊन विजयी
    •  पराभव जिव्हारी लागल्याने कार्यकर्ते संतप्त
    •  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यलयावर दगडफेक

    Defeat of Shashikant Shinde by one vote; Supporters throw stones at NCP office after Satara Bank election result

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस