• Download App
    शशिकांत शिंदे यांचा एक मताने पराभव ;सातारा बँकेच्या निवडणूक मातमोजणीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयावर समर्थकांची दगडफेक । Defeat of Shashikant Shinde by one vote; Supporters throw stones at NCP office after Satara Bank election result

    शशिकांत शिंदे यांचा एक मताने पराभव ;सातारा बँकेच्या निवडणूक मातमोजणीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयावर समर्थकांची दगडफेक

    विशेष प्रतिनिधी

    सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे केवळ एक मतांनी पराभूत झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करून पराभवाचा निषेध केला. Defeat of Shashikant Shinde by one vote; Supporters throw stones at NCP office after Satara Bank election result

    जावळी प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघात आमदार शशिकांत शिंदे यांना २४ मते मिळाली. तर ज्ञानदेव रांजणे २५ मते घेऊन विजयी झाले आहेत. हा पराभव शिंदे यांच्या समर्थकांचा जिव्हारी लागला. या पराभवाचे खापर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विशेषतः अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर फोडले आहे. या दोघांनी शिंदे यांना विजयी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, ते प्रत्यक्षात साकारले नाही. शिंदे यांचा एक मताने पराभव झाला. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली.



    दरम्यान, सातारा जिल्हा बँक निवडणुकीतील कराड तालुका सोसायटी गटात राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रतिष्ठेच्या लढाईत आठ मतांनी विजय मिळवला. त्यांनी संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या लढतीत राज्याचे माजी सहकार मंत्री स्व. विलासराव पाटील – उंडाळकर यांचे सुपूत्र जिल्हा परिषद सदस्य ॲड. उदयसिंह पाटील यांचा पराभव केला. मागील सहा दशकांपासून एकतर्फी वर्चस्व असणाऱ्या कराड तालुका सोसायटी गटात स्व. विलासराव पाटील – उंडाळकर यांच्या निधनानंतर पहिल्याच निवडणुकीत उंडाळकर गटाचे वर्चस्व संपुष्टात आले असून आता नवीन अध्यायास प्रारंभ झाला.

    सातारा जिल्हा बॅंक : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचा पराभव

    जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघ निकाल

    • एकूण मते – 49
    • झालेली मते – 49
    • वैध मते – 48
    • अवैध मते – 01
    • उमेदवार आणि मिळालेली मते
    • शशिकांत शिंदे- 24
    • ज्ञानदेव रांजणे- 25
    • विजयी उमेदवार – ज्ञानदेव रांजणे
    • मतांचे लीड – 1

    Defeat of Shashikant Shinde by one vote; Supporters throw stones at NCP office after Satara Bank election result

    Related posts

    Nana Patole : सुप्रीम कोर्टात प्रकरण जाताच EVM मशिन्स जाळल्या:’ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी’प्रमाणे मोदी सरकारचा कारभार- नाना पटोले

    Rohit Pawar : रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन मागे:गिरीश महाजनांची शिष्टाई यशस्वी; अधिवेशनाच्या आधी चर्चेचे सरकारचे आश्वासन

    CM Devendra Fadnavis : ‘पांढऱ्या पट्ट्यांवरून’ राजकारण करणाऱ्यांना मते मिळत नाहीत:मुख्यमंत्री फडणवीसांचा मनसेला टोला; गिरगावात कार्यकर्त्यांची धरपकड