• Download App
    दीपक केसरकरांची उद्धव ठाकरेंना पुन्हा ऑफर; काँग्रेस - राष्ट्रवादीची साथ सोडा, तुमचे नेतृत्व स्वीकारू!!Deepak Kesarkar's offer to Uddhav Thackeray again

    दीपक केसरकरांची उद्धव ठाकरेंना पुन्हा ऑफर; काँग्रेस – राष्ट्रवादीची साथ सोडा, तुमचे नेतृत्व स्वीकारू!!

    प्रतिनिधी

    मुंबई : सध्या राज्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. दोन्ही बाजूंची सुनावणी झाली असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. निर्णय कुणाच्या बाजूने लागेल याबाबत अनिश्चितता आहे. अशातच कोल्हापूरचे पालकमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी थेट उद्धव ठाकरे यांना ऑफर दिली आहे. Deepak Kesarkar’s offer to Uddhav Thackeray again

    काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस यांनी उद्धव ठाकरे यांना फसविले आहे. काँग्रेस – राष्ट्रवादीसोबतची आघाडी उद्धव ठाकरे यांनी तोडावी, आजही आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहे, अशी भूमिका कोल्हापूरचे पालकमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी कोल्हापूरात मांडली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने श्री अंबाबाई मंदिराच्या कामांना सुरुवात केली आहे. याची पाहणी करण्यासाठी केसरकर कोल्हापूरात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.



    आम्ही जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविला म्हणून त्यांनी आमदार केले आहे. आज जनता आमच्यासोबत आहे. आम्हाला विकतच जायचे असते तर अडीच वर्षात केव्हाही गेलो असतो. उद्धव यांना आम्ही फसवलेले नाही. त्यांनी स्वत:च आम्हाला निघून जाण्यास सांगितले आहे. ही बाजू जनतेसमोर कधीतरी मांडली पाहिजे. दिल्लीत जेव्हा उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात हिंदुत्वाचा विचार सोडल्याबद्दल चूक झाल्याचे त्यांनी कबूल केले होते. महाराष्ट्रात गेल्या गेल्या ती दुरुस्त करु असा शब्द दिला होता. तो त्यांनी मोडला. त्यामुळे त्यांनीच जनतेची फसवणुक केली. उद्धव ठाकरेंना यांना काँग्रेस – राष्ट्रवादीने फसविले, त्याचा दोष त्यांनी आमच्या माथी मारला, असे केसरकर म्हणाले.

    Deepak Kesarkar’s offer to Uddhav Thackeray again

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस