• Download App
    कोल्हापूर मधील एचआयव्ही बाधित रूग्णांच्या संख्येत मागील दहा वर्षात घट | Decrease in the number of HIV infected patients in Kolhapur in the last ten years

    कोल्हापूर मधील एचआयव्ही बाधित रूग्णांच्या संख्येत मागील दहा वर्षात घट

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एचआयव्ही बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे असे निदर्शनास आले आहे. मागील 10 वर्षांमध्ये एचआयव्हीची टेस्ट केलेल्या लोकांची संख्या 75000 पासून 1.42 लाख इतकी झाली होती. 2020-21 या काळामध्ये एकूण 93000 लोकांनी एचआयव्हीची टेस्ट केली होती। त्यापैकी 357 लोक पॉझिटिव्ह होते. तर मागील एप्रिलपासून 22000 लोकांनी एचआयव्हीची टेस्ट केली होती. पैकी 191 लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह होते. कोल्हापूर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही संख्या मागील 10 वर्षांमध्ये प्रचंड वेगाने कमी होत आहे.

    Decrease in the number of HIV infected patients in Kolhapur in the last ten years

    एड्स प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल युनिटच्या अधिकारी दीपा शिपुरकर यांनी सांगितले, मागील दहा वर्षांमध्ये कोल्हापूरमधील एचआयव्ही बाधित रूग्णांची संख्या कमी होत आहे. एचआयव्ही कशामुळे होतो? त्याची लक्षणे कोणती? त्याचे उपाय यांच्याबाबत आम्ही सतत लोकांना जागरुक ठेवण्यासाठी विविध कार्यक्रम देखील घेत असतो. सुरुवातीच्या काळामध्ये सर्वात जास्त बाधित जिल्ह्यांच्या यादीत कोल्हापूर पाचव्या स्थानावर होते. पण आता तो नंबर नवव्या स्थानावर आला आहे आणि ही आनंदाची बाब आहे.


    HIV पॉझिटिव्ह महिलेला तब्बल 216 दिवस कोरोनाचा संसर्ग, शरीरात तयार झाले विषाणूचे खतरनाक 32 म्यूटेशन


    त्या पुढे म्हणतात, आम्ही बऱ्याच संस्थांना सोबत घेऊन कार्यक्रम आयोजित केले होते. आम्ही बऱ्याच अशा ग्रुपसोबत काम केले आहे ज्यांना एचआयव्हीची बाधा होऊ शकते. अशा लोकांना प्रशिक्षण देण्याचे आम्ही काम केले आहे. आम्ही फिल्म फेस्टिव्हल, ग्रामसभा, तसेच कार्यशाळा घेऊन स्त्रियांनादेखील याबाबत जागृत राहण्यासाठी मदत केली आहे.

    मागील 10 वर्षात प्रेग्नंट स्त्रियांमध्ये देखील एचआयव्हीचे प्रमाण कमी झाले आहे. मागील दहा वर्षांमध्ये एकूण 6.3 लाख प्रेग्नंट बायकांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली होती. पैकी 414 स्त्रिया एचआयव्ही पॉझिटिव्ह होत्या. प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे प्रेग्नंसीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये केलेल्या चाचणीमुळे एचआयव्ही पॉझिटिव्ह स्त्रिया सुदृढ बालकाला जन्म देऊ शकल्या. एकूण 51 डिलिव्हरीज पैकी फक्त एक बाळ एचआयव्ही पॉझिटिव्ह होते. अँटी रेट्रोव्हायरल थेरपी चा देखील या सर्वांमध्ये खूप उपयोग झाला होता असे त्या म्हणाल्या.

    Decrease in the number of HIV infected patients in Kolhapur in the last ten years

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा