प्रतिनिधी
मुंबई : गोरेगावच्या पत्राचाळ जामीन घोटाळा प्रकरणी ईडीसमोर जबाब नोंदविलेल्या स्वप्ना पाटकर यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. पाटकर यांनी ईडीला याबद्दल माहिती देत त्यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांच्या विरूद्ध दिलेला जबाब बदलावा, यासाठी जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे स्वप्ना पाटकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. Death threat to Swapna Patkar for testifying against sanjay Raut
– स्वप्ना पाटकर यांनी काय केली तक्रार?
मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या घोटाळा प्रकरणी ईडीकडून संजय राऊतांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात स्वप्ना पाटकर या साक्षीदार आहेत. ईडीने स्वप्ना पाटकरांचा जबाब नोंदवला आहे. त्यांची चौकशीही झाली. संजय राऊतांच्या विरोधात दिलेला जबाब मागे घ्यावा, याकरता बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचे स्वप्ना पाटकर यांनी या तक्रारीत म्हटले आहे.
स्वप्ना पाटकर यांनी ईडी समोर जबाब नोंदवला आहे. परंतु, पाटकर यांनी ईडी आणि मुंबई पोलिसांना एक पत्रही लिहिले आहे. यामध्ये त्यांनी आपल्याला दोन-तीन फोन नंबरवरून बलात्कार आणि हत्या करण्याची धमकी येत असल्याचे म्हटले आहे. राऊतांविरोधातील जबाब मागे घ्यावा, किंवा बदलावा यासाठी आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे या पत्रात म्हटले आहे. या पत्राची दखल ईडीने घेतली असून त्यांची ही तक्रार वाकोला पोलीस स्टेशन आणि मुंबई पोलीस आयुक्त तसेच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सहआयुक्तांनाही याची एक प्रत देखील पाठवण्यात आली आहे. सध्या मुंबई पोलीस यांची चौकशी करत आहेत.
Death threat to Swapna Patkar for testifying against sanjay Raut
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबाद की संभाजीनगर? : नामांतराच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान, शिंदे सरकारने केले होते छत्रपती संभाजीनगर
- शिंदे गटाची ठाकरेंना ऑफर : आमच्यासोबत या, शेवट गोड करू, आमचे पक्षप्रमुखपद रिकामे
- पोलीस कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलिसांच्या घरांसाठी आराखडा तयार करण्याचे प्रशासनाला निर्देश
- उमेश कोल्हे हत्येतील आरोपी शाहरुख पठाणला आर्थर रोड तुरुंगात इतर कैद्यांकडून बेदम मारहाण, नूपुर शर्मा प्रकरणात झाली होती कोल्हेंची हत्या