• Download App
    राज्यात ४८ तासांत मुसळधार पावसाचा धोका, हवामान खात्याचा इशारा; मुंबई-पुण्यासह अन्य ठिकाणी जोरदार वृष्टी Danger of torrential rains in the state in 48 hours

    Weather Update : राज्यात ४८ तासांत मुसळधार पावसाचा धोका, हवामान खात्याचा इशारा; मुंबई-पुण्यासह अन्य ठिकाणी जोरदार वृष्टी

    वृत्तसंस्था

    मुंबई : भारतीय हवामान खात्याने पुढील ४८ तासांसाठी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला. आठ जिल्हे वगळता राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
    गेल्या आठवड्यापासून मॉन्सूनसाठी पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे ४-५ दिवसांपासून राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यानंतर आता हवामान खात्याने पुढील ४८ तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला. आठ जिल्हे वगळता राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता आहे. उद्याही राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे.Danger of torrential rains in the state in 48 hours

    भारतीय हवामान खात्याने कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, बुलडाणा, अकोला, परभणी आणि नांदेड हे आठ जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र येलो अलर्ट जारी केला. पुढील काही तासांत याठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील वाशीम, यवतमाळ, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह सरी कोसळणार आहेत. संबंधित जिल्ह्यांत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. तसेच आकाशात विजा चमकत असताना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.

    उद्या राज्यात कमी अधिक प्रमाण

    उद्या जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे सात जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे. उद्या पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हळुहळू पावसाचा जोर कमी होणार आहे. विकेंडला राज्यातून मॉन्सून गायब होण्याची शक्यता आहे.

    Danger of torrential rains in the state in 48 hours

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस