Cruise Drugs Case : क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटकेतील सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या भवितव्याचा निर्णय आता मुंबईच्या सत्र न्यायालयात होणार आहे. आर्यनच्या जामिनाची दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी तर झाली होती, परंतु या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या एका मुद्द्यामुळे न्यायालयाने आर्यन खानचा जामीन फेटाळला. Cruise Drugs Case Aryal Khans bail rejected, NCB lawyers, Aryan sent Arthur Road jail
प्रतिनिधी
मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटकेतील सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या भवितव्याचा निर्णय आता मुंबईच्या सत्र न्यायालयात होणार आहे. आर्यनच्या जामिनाची दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी तर झाली होती, परंतु या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या एका मुद्द्यामुळे न्यायालयाने आर्यन खानचा जामीन फेटाळला.
…आणि जामीन फेटाळला
शुक्रवारी मुंबईच्या फोर्ट कोर्टच्या दंडाधिकाऱ्यांनी आर्यन खानसह 8 आरोपींच्या जामिनावर सुनावणी केली. दरम्यान, एनसीबीने आर्यनसह सर्व आरोपींना आर्थर रोड जेलमध्ये पाठवले आहे. दुसरीकडे न्यायालयात सुनावणी सुरू आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने जामिनाची सुनावणी करताना म्हटले की, हे न्यायालय या प्रकरणात जामीन देऊ शकत नाही. कारण ही एक मोठी गोष्ट आहे. एक मोठा कट आहे, ज्यामध्ये सर्व आरोपी एकमेकांशी जोडलेले आहेत. एनसीबीने सांगितले की, या प्रकरणात आरोपीला जामिनासाठी सत्र न्यायालयात जावे लागेल.
एनसीबीच्या या प्रकरणावर कडक भूमिका घेत दंडाधिकारी म्हणाले की, तुम्ही या मुद्द्यावर तुमचा मुद्दा ठेवा. जामीन का देता येत नाही, तुमचे युक्तिवाद द्या. हे न्यायालय जामीन का देऊ शकत नाही हेदेखील सांगा. राहिला प्रश्न निर्णयाचा, तर तो हे कोर्ट घेणार आहे. जामीन द्यायचा की नाही हे आम्ही ठरवू. आपण आम्हाला काय करावे हे सांगू शकत नाही.
आर्यन खानची आर्थर कारागृहात रवानगी
जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यन खान आणि इतर 5 आरोपींना आज रात्री आर्थर रोड जेलमध्ये राहावे लागेल. त्याला बॅरेक क्रमांक -1 मध्ये ठेवण्यात आले आहे, जे विशेष क्वारंटाईन बॅरेक आहे. गुरुवारी त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आर्यन खानला जामीन देण्यास नकार दिला.
जामिनासाठी करावी लागणार प्रतीक्षा
फोर्ट न्यायालयातून जामीन न मिळाल्यामुळे आता आर्यन खानला सत्र न्यायालयात जावे लागेल. शनिवार आणि रविवारी न्यायालय बंद राहणार आहे. अशा परिस्थितीत आर्यन खानला अजून किती दिवस तुरुंगात काढावे लागतील हे अद्याप स्पष्ट नाही.
कसाब, सालेम, संजय दत्तही होते या कारागृहात
मुंबई मध्यवर्ती कारागृहालाच आर्थर रोड कारागृह संबोधले जाते. याच कारागृहात 26/11चा क्रूरकर्मा अजमल कसाबलाही ठेवण्यात आले होते. यापूर्वी येथे अंडरवर्ल्डशी संबंधित कुप्रसिद्ध गुंडांना ठेवण्यात आलेले आहे. याशिवाय शस्त्रास्त्र प्रकरणात अटक झालेला बॉलीवूड अभिनेता संजय दत्तही याच तुरुंगात होता.
Cruise Drugs Case Aryal Khans bail rejected, NCB lawyers, Aryan sent Arthur Road jail
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : केंद्राचे मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम यांचा राजीनामा, म्हणाले- राष्ट्राची सेवा करणे परमसौभाग्य, पुन्हा शिक्षण जगतात परतणार
- Cruise Ship Drug Party Case : क्रूझ ड्रग्जप्रकरणी आर्यन खानचा जामीन फेटाळला, जामिनासाठी सत्र न्यायालयात जाण्याची सूचना
- एअर इंडिया ६८ वर्षांनंतर पुन्हा टाटांची : रतन टाटा म्हणाले ‘वेलकम बॅक’, तब्बल १८ हजार कोटींमध्ये झाला करार
- मुख्यमंत्रिपदासाठी सिद्धूंची तडफड कायम, व्हायरल व्हिडिओत म्हणाले, मला सीएम केले असते, यश दिसले असते, चन्नी 2022 मध्ये काँग्रेसला बुडवणार!
- ठाकरे – पवार सरकार वसुलीत “ससा”; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी “कासव”; देवेंद फडणवीस यांचे टीकास्त्र