वृत्तसंस्था
मुंबई : तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज शेतकऱ्यांना बिनव्याजी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. Crop loans up to Rs 3 lakh interest free, decision of the state government; Relief to regular repaying farmers
केंद्र आणि राज्य शासन देत असलेली प्रत्येकी ३ टक्के व्याजदर सवलतीचा एकत्रित फायदा मिळाल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत सुधारणा केली आहे.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याची घोषणा केली होती. पीककर्जावर एकूण ६ टक्के व्याज आकारले जाते. त्यातील तीन टक्के व्याज सवलत केंद्र सरकार देते. आज राज्य शासनाने तीन टक्के सवलतीचा निर्णय घेतल्याने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य व्याज पडणार आहे.
Crop loans up to Rs 3 lakh interest free, decision of the state government; Relief to regular repaying farmers
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात, आम्ही पारदर्शक! पण कोरोनाचे ११,५०० मृत्यू लपविल्याचे उघड
- बांग्लादेशातून अवैधरीत्या भारतात प्रवेश करणाऱ्या चिनी नागरिकाला BSF ने केली अटक
- क्रेडिट सुईसचा अहवाल : भारतातील निम्म्या लोकसंख्येत कोरोना अँटीबॉडीजची शक्यता, अर्थव्यवस्था लवकरच रुळावर येणार
- Government Guidelines for Children : कोरोना संक्रमित बालकांसाठी नवी गाइडलाइन, रेमडेसिव्हिरचा वापर न करण्याचे निर्देश
- Mumbai Building Collapse : इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांनी जखमींची घेतली भेट