• Download App
    भाजपवर टीका करत पवारांनी उत्तर प्रदेशातली काँग्रेस फोडली; माजी आमदार सिराज मेहंदी राष्ट्रवादीत!! |Criticizing BJP, Pawar slammed Congress in Uttar Pradesh; Former MLA Siraj Mehndi in NCP

    भाजपवर टीका करत पवारांनी उत्तर प्रदेशातली काँग्रेस फोडली; माजी आमदार सिराज मेहंदी राष्ट्रवादीत!!

    प्रतिनिधी

    मुंबई : देशातल्या पाच राज्यांपैकी तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढवेल, अशी घोषणा करताना अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले पण त्याचवेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील काँग्रेस पक्ष फोडला. काँग्रेसचे विधान परिषदेचे माजी आमदार सिराज मेहंदी यांनी मुंबईत काँग्रेस सोडून शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.Criticizing BJP, Pawar slammed Congress in Uttar Pradesh; Former MLA Siraj Mehndi in NCP

    राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासमवेत युती करून निवडणूक लढवणार आहे. युती करण्याच्या चर्चेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष के. के. शर्मा हे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करणार आहेत. सिराज मेहंदी हे गेली



    30-40 वर्षे उत्तर प्रदेशात गांधी – नेहरूंच्या विचाराने राजकारण करत होते. अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचा संपर्क आहे. उत्तर प्रदेशात ते परत गेल्यानंतर सहकार्‍यांशी चर्चा करतील आणि माझ्या उत्तर प्रदेश दौऱ्याच्या वेळी त्यांच्या अन्य सहकाऱ्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 80% जनता आमच्या बरोबर असल्याचे विधान केले आहे हे गैर आहे. मुख्यमंत्री या सर्व प्रदेशाचा असतो. 100% जनता त्याची असते, असा टोला त्यांनी योगी आदित्यनाथ यांना लगावला. पण एकीकडे भाजपवर टीकास्त्र सोडत असताना प्रत्यक्षात काँग्रेस फोडून पक्षाच्या माजी आमदाराला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लावले आहे.

    Criticizing BJP, Pawar slammed Congress in Uttar Pradesh; Former MLA Siraj Mehndi in NCP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!