• Download App
    विनापरवाना रॅली काढल्याप्रकरणी ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधात गुन्हा|Crime registered against the office bearers of Brahmin Federation for holding unlicensed rallies

    विनापरवाना रॅली काढल्याप्रकरणी ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधात गुन्हा

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्या 321 व्या जयंतीनिमित्त लाल महाल ते शनिवार वाडा अशी मिरवणूक काढल्याप्रकरणी ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधात विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरोनामुळे लागू असलेल्या जमावबंदी नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.Crime registered against the office bearers of Brahmin Federation for holding unlicensed rallies

    ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे, मनोज तारे, श्रीपाद कुलकर्णी, मयुरेश घाणेकर, विनोद जोशी, मदन सिन्नरकर यांच्यासह 25 जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार गणेश राजाराम तूर्के यांनी फिर्याद दिली आहे.



    गुरुवारी श्रीमंत बाजीराव पेशवा यांचे 321 वी जयंती होती. या जयंतीनिमित्त शनिवारवाड्यावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी लाल महाल ते शनिवार वाडा अशी पदयात्रा काढण्यात आली.

    या मिरवणुकीमध्ये घोडा, वाजंत्री आणि पाच पेक्षा अधिक लोकांना समाविष्ट करून घेण्यात आले होते. बेकायदा जमाव जमून प्रतिमापूजन करण्यात आले. या वेळी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे देखील उल्लंघन झाल्याचे फिर्यादी मध्ये नमूद करण्यात आले आहे.

    Crime registered against the office bearers of Brahmin Federation for holding unlicensed rallies

    विशेष प्रतिनिधी

    Related posts

    Manoj Jarange : हुल्लडबाज आंदोलक की सरकार हे समजून घ्या, मनोज जरांगे यांचे पत्रकारांना आवाहन

    Manoj Jarange : मुंबई हायकोर्टाने फटकारल्यानंतर मनोज जरांगे यांच्या अंगावरून आंदोलनाची जबाबदारी झटकायला सुरुवात!!

     High Court : उच्च न्यायालय म्हणत आंदोलकांनी आमच्याच गाड्या अडवल्या ; उद्या ४ वाजे पर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश