सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी डेपोचं गेट बंद करून आंदोलन आणखी तीव्र केलं.Crime filed against 70 employees including Padalkar, ST agitation revolves
विशेष प्रतिनिधी
सांगली : गोपीचंद पडळकर हे आपल्या खास शैलीत बोलण्यामुळे आणि आक्रमक पवित्र्यामुळे सतत चर्चेत असतात.दरम्यान राज्यात ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.
या संपात कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी डेपोचं गेट बंद करून आंदोलन आणखी तीव्र केलं.
या प्रकरणात आता पोलिसांंनी गुन्हा दाखल केला असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 70 एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांना हे एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन महागात पडल आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना फुस लावून बेकायदेशीर आंदोलन केल्याने तसेच आटपाडी एसटी आगाराच्या गेटला बंद केल्याप्रकरणी पडळकर समर्थक आणि एसटी कर्मचाऱ्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आता आमदार गोपीचंद पडळकर यांची काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Crime filed against 70 employees including Padalkar, ST agitation revolves
महत्त्वाच्या बातम्या
- प. बंगालमध्ये राजीव बॅनर्जी यांची भाजपला सोडचिठ्ठी, ममतांचे आभार मानत केला तृणमूलमध्ये प्रवेश
- G20 Summit: पंतप्रधान मोदी आज ब्रिटनला ; हवामान बदल आणि पर्यावरणावरील परिषद;काय आहे परिषदेचा अजेंडा?
- औरंगाबादमधील एमआयएमचे 10 नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला, एमआयएममध्ये फुट पडल्याची ऑडिओ क्लिप व्हायर,
- एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मोडण्यासाठी महामंडळाचा कठोर कारवाईचा विचार