• Download App
    |तोंडाद्वारे पंपाच्या साहाय्याने 'स्टिरॉइड' उपचारपद्धती , सौम्य ते माध्यम स्वरूपाच्या कोरोना रुग्णांना वरदान ; तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच उपचार घ्या|Covid-19 Oral steroid therapy is a New Invention.

    तोंडाद्वारे ‘स्टिरॉइड’ देण्याची नवी उपचारपद्धती , कोरोना रुग्णांना वरदान ; डॉक्टरांचा सल्ला आवश्यक

    वृत्तसंस्था

    मुंबई :  कोरोनाचे संकट वाढत आहे. कोरोनाने पुन्हा तोंड वर काढले आहे. तो स्वतःच्या रचनेत बदल घडवून अधिक आक्रमक होत असताना उपचार पद्धतीसुद्धा त्या प्रमाणे बदल घडविण्याची गरज आहे. त्यानुसार आता तोंडाद्वारे पंपाच्या साहाय्याने ‘स्टिरॉइड’ देणारी नवी उपचारपद्धती येणार आहे. Covid-19 Oral steroid therapy is a New Invention.

    राज्यातील डॉक्टरांचा टास्क फोर्स ह्या उपचारपद्धतीची शिफारस करणार आहे. काही दिवसातच या उपचार पद्धतीचा महाराष्ट्रात वापर होणार आहे. ही उपचार पद्धती सौम्य ते माध्यम स्वरूपाच्या रुग्णांमध्ये वापरण्यात येणार आहे. यामुळे रुग्णांच्या फुफ्फुसाला आलेली सूज कमी करण्यास मदत होईल, असे वैद्यकीय तज्ञ सांगत आहेत.



    सध्या श्वसनविकारशी संबंधित किंवा अस्थमाचे रुग्ण पंपाद्वारे अशाच पद्धतीचे औषध घेतात. त्याच पद्धतीने हे स्टिरॉइड घेण्याची पद्धत आहे. मात्र डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय हे औषध घेऊ नये, असे सूचित केले आहे.

    काही दिवसापूर्वीच ऑक्सफर्ड विद्यापीठाचा अभ्यास लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसिन जरनलमध्ये प्रसिद्ध केला होता. 14 दिवसांकरिता पंपाने या औषधाचे दोन पफ्फस घेतल्याने रुग्णाला रुग्णालयात भरती करण्यात येण्याची शक्यता कमी होते.

    असल्याचे  सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या रुग्णासाठी ते प्रभावी ठरले आहे.ग्लोबल रुग्णालयातील श्वसनविकार तज्ञ डॉ. समीर गर्दे या उपचारपद्धतीबद्दल अधिक माहिती देताना सांगतात की, “ही उपचार पद्धती खरोखर चांगली आहे.

    याचा नक्कीच सुरुवातीच्या काळात फायदा होऊ शकतो. आम्ही अशा पद्धतीचे उपचार आमच्या अस्थमाच्या आणि श्वसन विकाराशी संबंधित रुग्णामध्ये या पूर्वी वापरत आहोत, त्यांच्यामध्ये चांगले परिणाम दिसत आहेत.

    त्याचपद्धतीने जर सुरुवातीच्या काळात रुग्णांमध्ये ही उपचारपद्धती वापरली तर त्याचा नक्कीच फायदा होईल. यामुळे रुग्णांच्या फुफ्फुसांना जी सूज येते ती कमी होण्यास मदत होणार आहे.”

    डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्या : कुलकर्णी

    पुणे येथील केईएम रुग्णालयातील श्वासविकार तज्ञ डॉ. स्वप्नील कुलकर्णी यांच्या मते, “हा एक चांगला पर्याय आहे. जुने अस्थमाचे किंवा श्वासनविकारशी संबंधित रुग्ण कोरोनाचा संसर्ग होऊन भरती झाले होते.

    त्यांना फारसा या आजाराचा त्रास झालेला नव्हता. कारण ते अशा स्वरूपाची उपचार पद्धती पूर्वीपासून घेत आहेत. हे औषध घेण्याची एक पद्धत आहे. औषध घशाद्वारे फुफ्फुसापर्यंत जाणे अपेक्षित आहे. जर ते घशातच राहिले तर फंगल इन्फेक्शनचा त्रास होतो. त्यामुळे ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.

    Covid-19 Oral steroid therapy is a New Invention.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!