प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशभरासह महाराष्ट्रात पुन्हा एकदा करोना रूग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रात रूग्ण वाढीचे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक दिसत आहे. सर्वासामान्यांपासून ते अगदी मंत्री देखील करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. Covid 19 Minister Shambhuraj Desai Corona Positive Treatment started in home isolation
शंभूराज देसाई यांनी ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. ‘’माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी निवासस्थानी गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या तीन-चार दिवसांत माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन करतो.’’ असं त्यांनी सांगितलं आहे.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनाही करोना संसर्ग झाला असल्याची माहिती समोर आली होती. त्यांची प्रकृती स्थिर असून, ते सध्या त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. छगन भुजबळ यांना सोमवारी अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यानंतर त्यांची करोना चाचणी करण्यात आली होती, जी पॉझिटिव्ह आली आहे. छगन भुजबळ यांनीही जे आपल्या संपर्कात आले होते त्यांनी करोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन केलं आहे.
Covid 19 Minister Shambhuraj Desai Corona Positive Treatment started in home isolation
महत्वाच्या बातम्या
- सावरकर मुद्द्यावर शिवसेनेशी मतभेद; पण महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी तेच काँग्रेसकडे आले; अशोक चव्हाणांचे शरसंधान
- ‘’मुंबई महानगरपालिकेतील ८ हजार ४८५ कोटींच्या घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करा’’ आशिष शेलारांनी मुख्यमंत्री शिंदेंना पाठवले पत्र!
- भगतसिंह कोश्यारींचा हेतू महापुरुषांचा अवमान करण्याचा नव्हता, तर समाजप्रबोधनाचा होता – मुंबई उच्च न्यायालय
- ‘’जीवनात हीच कामं आपल्याला आशीर्वादरूपी मदत करतात’’ म्हणत जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केल्या भावना!