• Download App
    देशद्रोहाच्या कलमावरून कोर्टाची फटकार; तरी दिलीप वळसे, अनिल परब ताठर!!Court slaps treason clause dilip walase and anil parab

    Navneet Rana : देशद्रोहाच्या कलमावरून कोर्टाची फटकार; तरी दिलीप वळसे, अनिल परब ताठर!!

    प्रतिनिधी

    मुंबई :  मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणण्याचा आग्रह धरणाऱ्या राणा दाम्पत्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १२४-अ नुसार राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही, असे निरीक्षण नोंदवत मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी ठाकरे – पवार सरकारला एक प्रकारे फटकार लगावली. तरीही ठाकरे – पवार सरकारचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मंत्री अनिल परब यांनी सरकारची ताठर भूमिका सोडली नाही. राणा दाम्पत्यावरचे देशद्रोहाचे आरोप योग्यच असलेल योग्यच लावले होते असा दावा दोन्ही मंत्र्यांनी केला आहे. Court slaps treason clause dilip walase and anil parab

    राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करताना हायकोर्टाने ठाकरे – पवार सरकारला फटकारले मात्र तीही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ताठर भूमिका सोडली नाही. टिप्पणी करणे हा न्यायालयाचा अधिकार आहे. पण पोलिसांनी अभ्यास करुनच राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता, असा दावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला. न्यायालयाचे निरीक्षण म्हणजे निकाल नाही आहे असे समर्थन अनिल परब यांनी केले.

    – हायकोर्टाची फटकार

    •  अर्जदारांनी (राणा दाम्पत्य) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेली वक्तव्ये अत्यंत आक्षेपार्ह होती. राज्यघटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काची मर्यादा अर्जदारांनी ओलांडली यात वाद नाही. मात्र, त्यांची वक्तव्ये ही कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याच्या किंवा सरकारविरोधात चिथावणी देऊन हिंसा घडवण्याच्या उद्देशाने होती, असे दिसत नाही.
    •  कलम १२४-अ हे राजद्रोहाचे कलम लावण्यासाठी सरकारविरोधात हिंसा होण्याकरिता हेतूपूर्वक चिथावणी देणे किंवा हेतूपूर्वक कायदा-सुव्यवस्था बिघडवणे असे विधान अथवा कृत्य आवश्यक असते. त्यामुळे या प्रकरणात राजद्रोहचा गुन्हा घडल्याचे सकृतदर्शनी दिसत नाही.
    •  राणा दाम्पत्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १२४-अ नुसार राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही. मुंबई पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना नोटीस बजावल्यानंतर ते दोघेही खार येथील निवासस्थानातून बाहेर पडले नव्हते. त्यांनी आपलं आंदोलनही मागे घेतले होते. त्यानंतरही त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे चुकीचे होते.

    हायकोर्टाने एवढे कठोर निरीक्षण नोंदवूनही दिलीप वळसे पाटील यांनी राजद्रोहाच्या कारवाईचे समर्थन केले. पोलिसांनी अभ्यास करूनच राणा दंपत्याविरोधात देशद्रोहाचे 124 ए हे कलम लावले होते, असा दावा त्यांनी केला आहे.

    Court slaps treason clause dilip walase and anil parab

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य