विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांना न्यायालयाने दणका दिला आहे. कारण त्यांनी , शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाच्या पोलिस चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. Court slaps Revenue Minister Abdul Sattar, false information in affidavit; orders for police inquiry
सिल्लोड सोयगाव विधानसभा १०४ निवडणूक सन २०१९ मधील नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेले शपथपत्रामध्ये मालमत्तेचे विवरण, खरेदी मूल्य, शेअर्स व शैक्षणिक अर्हता यांची खोटी व दिशाभूल करणारी माहिती सत्तर यांनी दिली. या प्रकरणी, डॉ. अभिषेक हरदास, पुणे व सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली, सिल्लोड यांनी दिनांक २७/१० /२०२१ रोजी सिल्लोड न्यायालयात न्यायमूर्ती एस, एस. धनराज यांच्याकडे संयुक्त याचिका दाखल केली होती. प्रकरणात कारवाई करून, अब्दुल सत्तार यांच्या वर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सदर याचिकेमध्ये न्यायालयाने तक्रारदाराचा युक्तिवाद ऐकून सी.आर.पी.सी २०२ अंतर्गत पोलिस चौकशीचे आदेश बुधवारी दिले आहेत.
Court slaps Revenue Minister Abdul Sattar, false information in affidavit; orders for police inquiry
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा, 24 वर्षीय तरुणीचा जबरदस्तीने गर्भपात
- भ्रष्टाचाराच्या सुरस कथा, ट्रक भर पुराव्यांच्या पोकळ बाता : गो. रा. खैरनार ते संजय राऊत व्हाया गोपीनाथ मुंडे!!
- मोठी दुर्घटना : उत्तर प्रदेशात विहिरीत पडून 13 जणांचा मृत्यू मृतांमध्ये 10 मुली; हळदीच्या विधीसाठी विहिरीवर गेले, स्लॅब तुटल्याने पाण्यात पडले
- राऊतांचा सोमय्यांवर नवा आरोप : अमित शाह, फडणवीसांच्या नावे धमकावत 7500 केले गोळा!!
- समाज में सब नंगे; हिजाबचे समर्थन करणाऱ्या स्वरा भास्करचा हॉट फोटो प्रसिद्ध झाल्याने पितळ पडले उघडे
- ‘त्यांच्याकडे स्टेट एजन्सी, तर आमच्याकडे सेंट्रल एजन्सी’, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल