• Download App
    लाचखोरी प्रकरणात अनिल देशमुख यांचा वकील आणि सीबीआय सब इन्स्पेक्टरला दोन दिवस न्यायालयीन कोठडी corruption case relating to leaking information of a separate case against former Maharashtra Home Minister Anil Deshmukh

    लाचखोरी प्रकरणात अनिल देशमुख यांचा वकील आणि सीबीआय सब इन्स्पेक्टरला दोन दिवस न्यायालयीन कोठडी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : शंभर कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संदर्भातील सीबीआय अहवाल लिक करण्याच्या प्रकरणात देशमुखांचे वकील आनंद डागा आणि सीबीआय सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना दोन दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयने त्यांना आठवडाभरापूर्वी अटक केली होती. दोघांच्या जामीन अर्जावर आठ सप्टेंबर रोजी दिल्ली कोर्टात सुनावणी होणार आहे. corruption case relating to leaking information of a separate case against former Maharashtra Home Minister Anil Deshmukh

    अनिल देशमुख यांच्या संदर्भात सीबीआयने तयार केलेला अहवाल सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी याने लाच घेऊन लिक केला. अनिल देशमुख यांनी ही लाच आपला वकील आनंद डागा याच्यामार्फत दिल्याचा आरोप आहे.

    सीबीआयने आठवडाभरापूर्वी मुंबईतून आनंद डागा आणि अभिषेक तिवारी या दोघांनाही अटक करून ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला आणले. सुरुवातीला दोघांनी जामीन अर्ज केले होते. परंतु दिल्ली कोर्टाने ते फेटाळून त्यांना चौकशी आणि तपासासाठी सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. आता त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्ली कोर्टाने दिले आहेत. आठ सप्टेंबर रोजी त्यांच्या दोघांच्याही जामीन अर्जावर कोर्ट सुनावणी घेऊन निर्णय देणार आहे.

    अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीन चिट दिली आहे असा दावा संबंधित अहवालात करण्यात आला होता. हा अहवाल लिक करण्यात अभिषेक तिवारीने मदत केली. त्याला आयफोन हवा होता. तो आनंद डागा यांनी दिला, असे सीबीआयने कोर्टात सांगितले. अभिषेक तिवारी हा सीबीआयचा सब-इन्स्पेक्टर आहे. संबंधित अहवाल लिक झाल्यानंतर सीबीआयने त्याला आणि आनंद डागा याला अटक करून दिल्लीला आणले आहे. दोघेही आता न्यायालयीन कोठडीत दोन दिवस राहतील.

    corruption case relating to leaking information of a separate case against former Maharashtra Home Minister Anil Deshmukh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस