विशेष प्रतिनिधी
मुंबई : महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगर पंचायती यांच्या क्षेत्राची प्रभागांमध्ये विभागणी करण्याची आणि त्यांच्या हद्दी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली असेल किया पूर्ण केली असेल तर तीज्ञप्रक्रिया रद्द करण्यात आली असल्याचे मानण्यात येईल, असे एका शासकीय अध्यादेशात म्हटले आहे. Corporation ward structure canceled
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह १४ महानगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. ओबीसी आरक्षण निश्चित करण्याचा प्रश्न लांबला आहे. राज्य सरकारने नुकताच अध्यादेश काढून मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सर्व अधिकार आपल्या ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे पुण्यासह चौदा महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रभाग रचनाही रद्द करण्यात आली आहे, तसा आदेश नुकताच पालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे.
राज्य सरकारने मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत अधिनियमात सुधारणा केल्या आहेत. आता सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकारला निवडणुका, आरक्षण आणि निवडणूक प्रक्रियेचे नियोजन करण्याचे सर्व अधिकार आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने आता महापालिका निवडणुकीसाठी केलेली प्रभाग रचना रद्द केली आहे. तसा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला.
Corporation ward structure canceled
महत्त्वाच्या बातम्या
- GREAT INDIA : स्टीव्ह वॉने मित्राची शेवटची इच्छा केली पूर्ण ! हिंदू मान्यतेनुसार अस्थिचं वाराणसीत विसर्जन…
- Maharashtra Budget 2022 : शिवसेनेच्या आमदारांची तक्रार खरीच, अर्थसंकल्पात राष्ट्रवादीच्या वाट्याला तब्बल ५७ % निधी, फडणवीसांनी काढले वाभाडे
- Maharashtra Budget 2022 : मुंबई तुपाशी, गडचिरोली उपाशी!! पालकमंत्री आदित्य ठाकरेंच्या मुंबईला 130 % निधी, एकनाथ शिंदेंच्या गडचिरोलीला 17 % निधी!!
- पिस्तुल बाळगणार्याला पोलिसांकडून बेड्या