• Download App
    कोरोणाचे संकट गेलेले नसताना, असे निष्काळजीपणे वागणे करिनाला अजिबात शोभत नाही ; मुंबई महापौर किशोरी पेडणेकर | corona's crisis is not over,how come kareena kapoor is so careless? ; Mumbai Mayor Kishori Pednekar

    कोरोणाचे संकट गेलेले नसताना, असे निष्काळजीपणे वागणे करिनाला अजिबात शोभत नाही ; मुंबई महापौर किशोरी पेडणेकर

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरोनाचा ज्वर पुन्हा वाढत असलेला दिसून येत आहे. अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता अरोरा या दोघींनाही कोरोनाची लागन झाली आहे. या दोघींनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे. त्यांना कोरोनाची लागण होण्याआधी त्यांनी काही पार्ट्यांना हजेरी लावली होती. ग्रँड हयात हॉटेलमध्ये झालेल्या पार्टीमध्ये देखील त्या सामील झाल्या होत्या.

    corona’s crisis is not over,how come kareena kapoor is so careless? ; Mumbai Mayor Kishori Pednekar

    तर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या दोघींना कोरोनाचे पालन न केल्याने चांगलेच फटकारले आहे. त्या म्हणाल्या, करीनाच्या घरी तिची दोन लहान मुले आहेत. कोरोणाचे संकट गेलेले नसताना, असे निष्काळजीपणे वागणे करिनाला अजिबात शोभत नाही. ग्रँड हयात हॉटेलमध्ये झालेल्या पार्टीमध्ये करीना हजर होती. त्यामुळे आता त्या पार्टीत हजर असणाऱ्या लोकांना आम्ही संपर्क साधून त्यांना कोरोनाची टेस्ट करायला सांगत आहोत.


    Kareena Kapoor : बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता अरोराला कोरोनाची लागण, नुकतीच अनेक पार्ट्यांमध्ये लावली होती हजेरी


    त्या पुढे म्हणाल्या की, तुम्ही किशोरवयीन मुले आहेत आणि पार्टीला गेला आहात, तर आम्ही समजू शकतो. पण तुमचे वय काय आणि तुम्हाला कोणत्या गोष्टींचा आनंद घ्यायला आवडतो? कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये सावधगिरी बाळगली पाहिजे. जे लाईमलाईटमध्ये आहेत त्यांनी तर खासकरून ही सावधगिरी बाळगली पाहिजे. करीनाला कोणाची भिती वाटत नाही का? कोरोणाचे नियम मोडल्यामुळे आम्ही का कठोर कारवाई करू नये? असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.

    पुढे त्या म्हणाल्या की, सध्या सर्वांनी करोनाचे नियम पाळणे आवश्यक आहेत. अनलॉक मार्गदर्शक तत्त्वांचा एक भाग म्हणून मेळावे कार्यक्रमांना उपस्थित राहण्याच्या बाबतीत शिथिलता दिली होती. मात्र याचा गैरफायदा घेतला जातोय. तर लोकांनी याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे.

    corona’s crisis is not over,how come kareena kapoor is so careless? ; Mumbai Mayor Kishori Pednekar

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस