• Download App
    कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक; दोन लसी घेतलेल्यांना प्रवासासाठी मुभा। Corona Virus Infection Test Is Mandatory For Those Going To Konkan For Ganesh Festival

    कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक; दोन लसी घेतलेल्यांना प्रवासासाठी मुभा

    वृत्तसंस्था

    मुंबई : मुंबई, ठाणे, पालघर, पुण्यातून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना ५ सप्टेंबर रविवारपासून करोना चाचणीलाही सामोरे जावे लागणार आहे. दोन लसीचे डोस किंवा ७२ तास आधी कोरोना चाचणी अहवालाची अट सरकारने कायम ठेवली आहे. यापैकी काही नसल्यास एसटी, रेल्वे स्थानकाबाहेर किंवा गावागावांत कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक आहे. Corona Virus Infection Test Is Mandatory For Those Going To Konkan For Ganesh Festival



    रेल्वे, एसटी, जलमार्गे येणाऱ्या प्रवाशांवर प्रशासनाकडून काटेकोर लक्ष ठेवले आहे. बस स्थानकातप्रवाशांची माहिती संकलित करून चालक-वाहक तालुक्याच्या एसटी आगारात जमा करतील. ही माहिती तहसील कार्यालयात रोज जमा करण्याचे आदेश दिले आहेत.  खासगी बसमधून आलेल्या प्रवाशांची माहितीही संकलित केली जाणार आहे. सोमवारी जिल्हाधिकारी, आरोग्य यंत्रणा, वाहतूक पोलिस, आमदार यांची बैठक बोलावली आहे. त्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा होईल, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले.

    Corona Virus Infection Test Is Mandatory For Those Going To Konkan For Ganesh Festival

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!