संबंधित मजुरांकडील कागदपत्रांची पडताळणी करून हे डोस देण्यात येतील.पहिले आणि दुसरे असे दोन्ही डोस दिले दिले जातील.Corona vaccine to be given to 1.5 lakh sugarcane workers in Solapur district; . Resident Deputy Collector Shama Pawar gave the information
विशेष प्रतिनिधी
सोलापूर : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लसीचे दोन डोस बंधनकारक करण्यात आले आहेत.शहर, जिल्ह्यात घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे.आता जिल्ह्यात आलेल्या ऊस तोड मजुरांना लस देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी पवार यांनी आरोग्य विभाग, साखर कारखानदार यांची संयुक्त बैठक घेतली. त्यात त्यांनी यासंबंधीची सूचना दिली.
‘जिल्ह्यात ऊसतोडीसाठी आलेल्या परजिल्ह्यातील दीड लाखाहून अधिक ऊसतोड मजुरांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. याची जबाबदारी संबंधित साखर कारखाना आणि आरोग्य विभागाकडे देण्यात आली आहे.
येत्या १५ दिवसांत हे लसीकरण पूर्ण करण्यात येईल.संबंधित मजुरांकडील कागदपत्रांची पडताळणी करून हे डोस देण्यात येतील.पहिले आणि दुसरे असे दोन्ही डोस दिले दिले जातील.”, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.
तसेच आरोग्य विभागाकडून मजुरांची संख्या पाहून प्रतिदिन लस किती देणार याचे नियोजन करावे, तर साखर कारखान्यांनी लसीकरण केंद्रासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, शमा सूचना पवार यांनी दिल्या.
Corona vaccine to be given to 1.5 lakh sugarcane workers in Solapur district; . Resident Deputy Collector Shama Pawar gave the information
महत्त्वाच्या बातम्या
- प्राप्तिकरातून साखर कारखान्यांची सुटका, केंद्रीय सहकार मंत्र्यांचा निर्णय ; एफआरपीपेक्षा उसाला दिलेला जादा दर आता नफा म्हणून गृहीत धरला जाणार नाही
- डोकं फिरलंया, नानाचं डोक फिरलंया, पंतप्रधानांता ताफा अडविण्यामागे अमित शहा यांचा हात असल्याची पटोलेंना शंका
- पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील चूक अक्षम्य, देशातील २७ माजी पोलीस महासंचालकांनी लिहिले राष्ट्रपतींना पत्र
- PUNJAB HIGH COURT : उच्च न्यायालयाला पंजाबची चिंता सरकारला पंतप्रधानांचा दौरा सांभाळता आला नाही-डेरा प्रमुखाला आणलं तर परिस्थिती कशी हाताळणार?