विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : माजी मंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला असल्याचं त्यांनी ट्विट करून सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात होते त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असंही आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे अधिवेशनातही हजर होते. CORONA UPDATE: BJP leader Radhakrishna Vikhe Patil corona positive; Information given on social media
काय आहे राधाकृष्ण विखे पाटील यांचं ट्विट?
आज माझी कोव्हिड टेस्ट पॉझीटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयीबद्दल क्षमस्व. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हिड टेस्ट करावी आणि काळजी घ्यावी. असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलाला लग्नाला उपस्थिती लावली होती. या लग्न सोहळ्यात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे इतर नेतेही उपस्थिती होते. याआधी राज्याचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना कोरोना झाला आहे. लसीचे दोन्ही डोस घेऊनही त्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोना झाला. वर्षा गायकवाड यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. त्या देखील हिवाळी अधिवेशनात हजर होत्या.
CORONA UPDATE : BJP leader Radhakrishna Vikhe Patil corona positive; Information given on social media
महत्त्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, अद्याप वेळ गेलेली नाही ; प्रशासनाचा इशारा
- राज्यपालांचा बळीचा बकरा, पृथ्वीराज चव्हाण यांना अध्यक्ष बनवायचे नसल्याने गुप्त मतदानाला ठाकरे- पवार यांचा विरोध ; किरीट सोमय्या यांची टीका
- Nora Fatehi : बॉलिवूडवर कोरोना कोपला ! नोरा फतेहीलाही कोरोनाची लागण!नोरा म्हणते-सुरक्षित रहा आणि मास्क घाला…
- रणवीर सिंहच्या ‘ 83 ‘ चित्रपटाचे सुपरस्टार रजनीकांत यांनी केले कौतुक
- ५३ जणांच्या धर्मांतरावर ख्रिश्चन संघटनेचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, समाजाच्या भावना दुखावल्याचे सांगत घटनेच्या चौकशीची मागणी