Corona In Mumbai : मुंबईत कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. संध्याकाळी 6 वाजता जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 3671 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह सक्रिय रुग्णांची संख्या 11,360 झाली आहे. गेल्या 24 तासांत 371 रुग्ण संसर्गातून बरे झाले आहेत. शहरात बुधवारी 2510, मंगळवारी 1377, सोमवारी 809, रविवारी 922, शनिवारी 757, शुक्रवारी 683 आणि गुरुवारी 602 रुग्ण आढळले. Corona In Mumbai Big increase in corona patients in Mumbai, 3671 new patients registered
प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. संध्याकाळी 6 वाजता जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 3671 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह सक्रिय रुग्णांची संख्या 11,360 झाली आहे. गेल्या 24 तासांत 371 रुग्ण संसर्गातून बरे झाले आहेत. शहरात बुधवारी 2510, मंगळवारी 1377, सोमवारी 809, रविवारी 922, शनिवारी 757, शुक्रवारी 683 आणि गुरुवारी 602 रुग्ण आढळले.
कोरोनाचा उद्रेक लक्षात घेता मुंबई पोलिसांनी हॉटेल आणि रेस्टॉरंटसह कोणत्याही बंद किंवा मोकळ्या जागेत नवीन वर्ष साजरे करण्यास आणि मेळावे घेण्यास बंदी घातली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) च्या कलम 144 अन्वये पोलिस उपायुक्त एस. चैतन्य यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा आदेश गुरुवारपासून 7 जानेवारी 2022 पर्यंत लागू असेल.
पोलिसांच्या आदेशानुसार हॉटेल, रेस्टॉरंट, बँक्वेट हॉल, बार, पब, ऑर्केस्ट्रा, रिसॉर्ट्स, क्लब आणि इमारतींच्या छतासह कोणत्याही बंद किंवा मोकळ्या जागेत नवीन वर्ष साजरे, कार्यक्रम आणि मेळावे घेण्यास मनाई आहे. सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि नियमांनुसार ट्रेन, बस आणि खासगी कार धावू शकतात, असे आदेशात म्हटले आहे.
कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही चिंता व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी एक पत्र लिहून दिल्ली, हरियाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि झारखंड या राज्यांना अलीकडच्या काळात देशांतर्गत प्रवास आणि लग्न, समारंभ यांसारख्या विविध कार्यक्रमांची वाढ लक्षात घेऊन सतर्क राहण्यास सांगितले आहे.
पत्रात म्हटले आहे की, झारखंडचे रांची, कर्नाटकचे बेंगळुरू अर्बन, हरियाणाचे गुडगाव, तामिळनाडूचे चेन्नई, महाराष्ट्राचे मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे आणि नागपूर आणि पश्चिम बंगालच्या कोलकाता येथेही गेल्या दोन आठवड्यांत रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे.
Corona In Mumbai Big increase in corona patients in Mumbai, 3671 new patients registered
महत्त्वाच्या बातम्या
- Kanpur IT Raid : अत्तर व्यापारी पीयुष जैनने जप्त केलेला खजिना कोर्टाला परत मागितला, कराचे आणि दंडाचे 52 कोटी वजा करा पण बाकीचे परत द्या!
- अब्रूनुकसानीचा खटला : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक कोर्टात गैरहजर, भाजप नेत्याचा 100 कोटींचा मानहानीचा खटला
- सिंधुदुर्ग पोलिसांनीच कायदा पाळला नाही, 65 वर्षांवरील व्यक्तीला पोलीस ठाण्यात साक्षीला बोलावताच येत नाही, फडणवीस आक्रमक
- विनामास्क कोणीही घराबाहेर पडता कामा नये ; किशोरी पेडणेकर यांचे आवाहन
- ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी जिल्ह्यात कडेकोट नाकाबंदीचे केले नियोजन