• Download App
    आकुर्डीमध्ये दोन सख्या भावांचा कोरोनाने मृत्यू, कर्ती मुले गमावल्याने कुटुंबावर दु;खाचा डोंगर|Corona has killed two brothers at Akurdi in Pimpri-Chinchwad.

    आकुर्डीमध्ये दोन सख्या भावांचा कोरोनाने मृत्यू, कर्ती मुले गमावल्याने कुटुंबावर दु;खाचा डोंगर

    पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी येथे दोन सख्या भावांचा कोरोनाने बळ घेतला आहे. कर्त्या मुलांच्या मृत्यूमुळे या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.Corona has killed two brothers at Akurdi in Pimpri-Chinchwad.


    विशेष प्रतिनिधी

    पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी येथे दोन सख्या भावांचा कोरोनाने बळ घेतला आहे. कर्त्या मुलांच्या मृत्यूमुळे या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

    आदित्य जाधव (वय २८ वर्षे) आणि अपूर्व जाधव (वय २५) अशी या दोन भावांची नावं आहेत. अपूर्वच्या कुटुंबातील इतर सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. घरातील दोन्ही कर्त्या मुलांचा कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे जाधव कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.



    अपूर्व आणि आदित्यला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी कोरोनाची तपासणी करुन घेतली. आदित्यचे आई, वडील आणि पत्नीला ही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

    आदित्यच्या आईने आणि पत्नीने कोरोनावर मात केली. पण आदित्य, अपूर्व आणि त्यांच्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरु होते. तिघेही कोरोनावर मात करुन घरी येतील असे सर्वांना वाटत होते.

    पण, दोघांची देखील प्रकृती गंभीर झाली. आधी 20 मे रोजी अपूर्वचे निधन झाले. त्याच्या निधनानंतर अवघ्या दोन दिवसांतच त्याचा भाऊ आदित्यचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला.

    कुटुंबाचा आधार असलेली दोन्ही मुलांचे निधन झाल्यामुळे जाधव कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. आदित्यचे दीड वषार्पूर्वीच लग्न झाले होते. अपूर्वचे लग्न ठरले होते आणि येत्या दिवाळीत त्याचे लग्न होणार होते. या घटनेमुळे आकुर्डीमध्ये शोककळा पसरली आहे.

    Corona has killed two brothers at Akurdi in Pimpri-Chinchwad.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !