वृत्तसंस्था
पुणे : राज्यातील ट्रान्सपोर्ट व्यवसाय कोरोनामुळे संकटात आला आहे. प्रथम 15 आणि नंतर दुसऱ्यांदा 15 दिवसांचा लॉकडाऊन लागल्यामुळे हा व्यवसाय डबघाईला आला आहे. अत्यावश्यक सेवांमुळे त्याला काहीसा आधार मात्र मिळाला आहे.Corona cripples transport business;The wheel of the economic cycle has turned due to the lockdown
मार्च २०२० पासून लॉकडाऊनमध्ये ६ महिने ट्रान्सपोर्ट व्यवसाय बंदच होता. आता लॉकडाऊनमुळे ट्रकच्या कर्जाच्या हप्ते थकले. त्यातच डिझेलच्या दरात वाढ झाल्याने ट्रान्सपोर्टची चाके गोत्यात आली आहे.
पुण्यासह अनेक शहरातील व्यापार ठप्प आहेत. त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. औद्योगिक नागरी असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये व्यापार बंद आहे. मालवाहतुकीची परवानगी असूनही ट्रक,लॉऱ्या जाग्यावरच उभ्या आहेत.
दुसरीकडे डिझेल दरवाढ झाल्याने गाडीभाडे परवडत नाही. टोलचा खर्च सुद्धा जास्त असल्याने ट्रान्सपोर्ट व्यवसाय आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. महाराष्ट्र वगळता इतर राज्यात ट्रान्सपोर्ट व्यवसाय तेजीत आहे, असे त्यांनी सांगितले.
डिझेल दरवाढीने मोठे नुकसान
कोरोनामुळे ट्रान्सपोर्ट चालक अडचणीत असतांना आता डिझेलचे दर वाढत असल्याने ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरु ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अगोदरच व्यवसाय कमी आहे.
मार्केटमध्ये ट्रकभाडे वाढवून देण्यास कोणीही तयार नाही. त्यामुळे मालकांवर आर्थिक बोजा वाढत आहे.अनेक मालकांचे वाहनांच्या कर्जाचे हप्ते थांबले आहे. त्यामुळे वाहने सुरु ठेवणे गरजेचे बनले आहे. एका ट्रकला दिवसभरात दीडशे लिटर डिझेल लागते. आता दरवाढीने तोटा परवडत नाही.
Corona cripples transport business;The wheel of the economic cycle has turned due to the lockdown
महत्त्वाच्या बातम्या
- वेश्याच्या निधीचा गैरव्यवहार : आमच्या खात्यात जमा झालेले पैसे परत घ्या ; हडपसर तेथील कष्टकरी महिलांचे अनोखे आंदोलन
- …अन्यथा या देशात फक्त मुडद्यांचं राज्य; संजय राऊत यांचा गंभीर इशारा
- धक्कादायक ! कोव्हॅक्सिन लशीने भरलेला कंटेनर सोडून ड्रायव्हर, क्लिनर पसार , मध्य प्रदेशातील घटना; अडीच लाख डोस मात्र सुरक्षित
- कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी लता मंगेशकर यांच्याकडून 7 लाख रुपयांची मदत
- महाराष्ट्रात लसीकरणासाठी गेलेल्या 18+ वयोगटाची निराशा, अजित पवार म्हणाले – 45 वर्षांपुढील लोकांसाठीही लसीचा साठा नाही