• Download App
    खासदार साध्वी प्रज्ञा यांच्या एमआयटीमधील वेबिनावरून वादंग, विद्यार्थी संघटनांचा विरोध|Controversy over MP Sadhvi Pragya's webinar in MIT, opposition of student unions

    खासदार साध्वी प्रज्ञा यांच्या एमआयटीमधील वेबिनावरून वादंग, विद्यार्थी संघटनांचा विरोध

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : भोपाळ मतदारसंघात निवडून आलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या वेबिनारमधील सहभागी होण्यावरून वाद सुरू झाला आहे. काही विद्यार्थी संघटनांनी विरोध करत वातावरण पेटविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला जात आहे.Controversy over MP Sadhvi Pragya’s webinar in MIT, opposition of student unions

    एमआयटीच्या स्कुल ऑफ गव्हर्नमेंटच्या वेबिनारसाठी २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या वेबिनारवरून वादंग निर्माण झाला असून काही विद्यार्थी संघटनांनी त्याला विरोध केला आहे. स्टुडंट्स हेल्पींग हँडचे कुलदीप आंबेकर म्हणाले, या कोर्सद्वारे विद्यार्थ्यांना राजकीय नेतृत्वाचे प्रशिक्षण दिले जाते.



    राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि संस्कृतिक क्षेञातील देशभरातील दिग्गज मान्यवर याठिकाणी मार्गदर्शनासाठी येत असतात. साध्वी प्रज्ञा यांच्यासारख्या बॉम्बस्फोटाचे आरोप असणाऱ्या व्यक्ती ‘एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट’ च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असतील तर निषेधार्थ आहे. त्यांच्यावर मोक्का ही लावण्यात आला होता.

    धर्मांध आणि विखारी वक्तव्य करणार्‍या, सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या, शहिद हेमंत करकरे यांचा अपमान करणार्‍याना मार्गदर्शन करायला लावून एमआयटीला काय साध्य करायचं आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

    Controversy over MP Sadhvi Pragya’s webinar in MIT, opposition of student unions

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!